Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
लंम्पी आजारावर प्रभावीपणे लसीकरण व उपाययोजना तात्काळ सुरू करा.पशुसंवर्धन विभागाकडे माजी नगरसेवक सुरज देसले यांची मागणी..!
लंम्पी आजारावर प्रभावीपणे लसीकरण व उपाययोजना तात्काळ सुरू करा.पशुसंवर्धन विभागाकडे माजी नगरसेवक सुरज देसले यांची मागणी..!
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा शहरात व ग्रामीण भागातील बरेचसे शेतकऱ्यांकडे पशुधन आहेत. राज्यात जनावरांना भेडसावणाऱ्या लंम्पीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यासाठी लसीकरण व उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात याव्यात.राज्य अनेक जिल्हासह धुळे जिल्ह्यातही पशुधनावर लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघडकीस आले आहे.
या आजाराविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी व लसीकरण करण्यात यावे.तसेच शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग प्रत्येक गावात जाऊन लसीकरण करण्यात यावे. लंम्पी आजाराचा प्रादुर्भावाने जनावराचे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्यात यावी.लंम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस,औषधे , साधन सामुग्री तात्काळ उपलब्ध करण्यात यावी.पशुधन आपली संपत्ती आहे त्याचे जपणूक करणे आवश्यक आहे.लंम्पीने पशूंना ग्रासले आहे.
याववर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पावले तातडीने उचलावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले यांनी शिंदखेडा येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा