मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अगोदर मी जनता दरबार घेणार असून या जनता दरबारात पूर्वीचे प्रश्न मार्गी लावले का हे विचारणार असल्याचे अधिकाऱ्यांना त्यांनी त्यावेळी बजावून सांगितलं होते.याच पार्श्वभूमीवर शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात दिनांक १६ शुक्रवार रोजी जनता दरबार भरविण्यात येणार असून, याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. जनता दरबारात आपली फजिती होऊ नये म्हणून मागील प्रश्नाची सोडवणूक तत्परतेने करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाचे अधिकारी कामाला लागल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.
Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२
शुक्रवारी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांचा जनता दरबार !!!
परंडा (राहूल शिंदे) दि.१५ महाराष्ट्र राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी जनता दरबारात लोकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. महसूल, ग्रामविकास, महावितरण, आरोग्य, सहकार, शिक्षणासह अनेक विभागाशी संबंधित तक्रारींवर डॉ सावंत सुनावणी घेतील.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विभागाचे सर्व उच्च अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहणार आहेत.उल्लेखनीय आहे की, गेल्या आठवड्यात तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी लोकांच्या समस्या ऐकल्या होत्या.त्यावर तातडीने उपाय-योजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा