Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

चिंचपूर बु.येथे मराठा आरक्षण बैठकीस प्रचंड प्रतिसाद...

परंडा (राहूल शिंदे)२३तालुक्यातील चिंचपूर बु.येथे मराठा आरक्षण महामोर्चा संदर्भात सकल मराठा समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली टीम क्रं.५ 'सिंहगड' यांनी बैठक घेऊन गावातील मराठा बांधवांना मार्गदर्शन केले.
मराठा समाजाला विदर्भ व खानदेशातील कुणबी मराठ्यांप्रमाणेओबीसी प्रवर्गाततून ५० ट्क्केच्या आतील आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने, आरक्षण नाही तर, मतदान नाही हा आक्रमक पवित्रा घेऊन ८ नोव्हेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन समन्वयकांच्या वतीने करण्यात आले.
बैठकीमध्ये यावेळी आपणांस सावध भूमिका घेऊन ५०%च्या आतच ओबीसी मधूनच टिकाऊ आरक्षण देण्यात यावे हा मुद्दा लावून धरायचा आहे.यासोबतच आपल्या अन्य मागण्यांसाठी दि.८ नोव्हेंबर रोजी परंडा शहरात आयोजीत केलेल्या महामोर्चात स्वखर्चाने मुली-महिलांसह लाखोंच्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध