Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

तळोदा येथील खान्देशी गल्लीत चोरी ; ५२ हजाराचे दागिने लंपास...!



नंदुरबार प्रतिनिधी:तळोदा शहरातील खान्देशी गल्ली या भरवस्तीत चोरट्यांनी बंद घराच्या कडीकोंडा तोडून शिक्षकाच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५२ हजाराचा ऐवज चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडला.भर वस्तीतील चोरीने चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तळोदा शहरातील खान्देशी गल्लीत नेमसुशील माध्यमिक विद्या मंदिराचे शिक्षक सचिनकुमार पंचभाई हे भाड्याच्या घरात राहतात. ३० नोव्हेंबर रोजी घरातील सर्व सदस्यांसह पंचभाई हे आपल्या संपूर्ण परिवारासह नाशिक येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी घराला कुलूप लावून गेले होते.

नाशिक येथून परतीचा प्रवासात २ डिसेंबरला नंदुरबार येथेच मुक्कामी राहिले.३ डिसेंबर रोजी सकाळी शाळेत ड्युटीसाठी नंदुरबार येथून निघाले असता घर मालकाच्या त्यांना फोन आला.तुमच्या घराच्या दरवाजा उघडा होता व माझ्या घराला पुढील दरवाजाला कडी लावलेली होती.

तेव्हा तुम्ही ताबडतोब घरी या, असे त्यांनी सांगितले.त्यानंतर घरी येऊन त्यांनी पाहिले असता लोखंडी कपाटातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन, साडेसात ग्रॅम वजनाचा दोन सोन्याचा अंगठया,अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल व रोख रक्कम २ हजार रुपये असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.

त्यामुळे अज्ञात चोरट्यांचा विरोधात सचिन पंचभाई यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हे. कॉं. सुधीर गायकवाड करीत आहेत.

रात्रीच्या गस्तसाठी पोलीस कर्मचारी वाढवावे

तळोदा शहरातील खान्देशी गल्लीमधील भरवस्तीत चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. याकरिता तळोदा पोलिसांनी रात्रीची गस्तसाठी पोलीस कर्मचारी वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तळोदा शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध