Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

सामाजिक कार्यातून बांधिलकी जोपासणारे भैय्यासाहेब दहिते यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार.



साक्री तालुक्यातील माळ माथा परिसरातील वासखेडी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते मा.भैयासाहेब दहिते यांना सटाणा येथे ""स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार""ने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्य क्षेत्रात राहून त्यांनी भैय्या दहिते युवा मंच स्थापन करून पाणी अडवा पाणी जिरवा, नाला बांध खोलीकरण, एक वृक्ष जीवनाचा असे उपक्रम केल्याने त्यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्व. बाबुलाल जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त दै.प्रहार, पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे सटाणा येथे आयोजित कार्यक्रमात मा भैय्यासाहेब दहिते यांना """ स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार """ने सन्मानित करण्यात आले. भैय्या दहिते यांनी त्यांच्या वासखेडी परिसरात सामाजिक कार्यात भर दिली असून समाजातील विविध घटकांना एकत्र करून न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रामाणिक असतात.या कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देत सन्मानित करण्यात आले.सुरगाना येथील राजसंस्थानिक रोहित राजे देशमुख पवार, एल सी बी अधिक्षक नाशिक हेमंत पाटील, निसर्ग मित्र समितीचे सटाणा शहर अध्यक्ष संतोष जाधव, सचिव प्रशांत कोठावदे, निसर्ग मित्र समिती धुळे जिल्हाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. भैय्यासाहेब दहिते यांना पुरस्कार मिळाल्याने वासखेडी गावात नाव लौकिकात  भर पडली असून
त्यांचे भालचंद्र दामोदर कुवर (मुख्याध्यापक) पी. झेड.कुवर, सुनील वामन कुवर नाशिक, प्रा. सुधाकर जाधव, गायकवाड मॅडम,  बी. एन कुवर सर,जगदीश सावळे, दिपक जाधव व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध