Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी,वाल्मीक नगर व गुरुदत्त कॉलनी या शाळेत प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा...!



शिरपूर प्रतिनिधी:-शहरातील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी,वाल्मीक नगर व गुरुदत्त कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी आशाताई बागुल,मीनाक्षी राठी,नरेंद्रभाऊ पाटील,विजय साहेबराव माळी, रेखा सूर्यवंशी,गोपाल पाटील व गणेश साळुंके हे उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रमुख मान्यवरांनी ध्वजेचे पूजन केले.त्यानंतर आशाताई बागुल यांच्या शुभहस्ते ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रगीत व झेंडा गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.
       
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल वरसाळे तर आभार करोडे सरांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तिनही शाळेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध