Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२२ मधील मंजूर कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जितेंद्र पावरा यांची मागणी...!



शिरपुर प्रतिनिधी :- तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत येथे दि:-26/1/2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेची आयोजन करण्यात आले ग्रामसभेत जितेंद्र पावरा महा.राज्य संघटक यांनी अर्जाव्दारे ग्रामसेवक व सरपंच यांना सन 2022 च्या शासनाने मंजुरी देण्यात आलेल्या कामांना लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

या अर्जावर म्हटले आहे की, १५ वा वित्त आयोग / पेसा कायदा योजने अंतर्गत सन २०२२ च्या कृतीआराखडा तयार करण्यात आला त्यात ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या  गावापाड्यात सर्वे कडुन जे आवश्यक असलेल्या कामांची यादी तयार करुन सन २०२२ चा कृतीआराखडा ते काम घेण्यात आले होते त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायत ने वेळोवेळी केला असुन अखेर शासनाने अत्यंत आवश्यक असल्याले कामांना मंजुरी देऊन सन २०२२ च्या १५ वा वित्त आयोग / पेसा कायदा योजने अंतर्गत निधी देखील मंजूर करण्यात आला असून जे कामे अजून पर्यंत सुरू करण्यात आले नाही किंवा काही कारणाने बंद कामे आहेत ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी जितेंद्र पावरा यांनी ग्रामसभेत अर्जाद्वारे करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध