Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
आता राज्यातील सर्वांना आरोग्या बाबत एक मोठा दिलासा.महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट करणार
आता राज्यातील सर्वांना आरोग्या बाबत एक मोठा दिलासा.महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट करणार
□ महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू...
○सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार...
□या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्या मधून मोफत मिळणार...
युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या
सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे...
□महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केलेला आहे.सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे...
○योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत त्यानुसारच आकारणी...
○मुंबई मध्ये या सेवा-कॅन्सर,मेंदू,मणका, किडनी,लिव्हर किंवा असे जे महाभयानक रोग आहेत, त्या रुग्णांना फार मोठा आधार या उपचारांचा...
या विस्तारित महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊ घ्या.
○ज्या रुग्णांना ताप,सर्दी,खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील...
□बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरानी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेअंतर्गत सर्व ते उपचार करावेत...
अनेकांना आर्थिक फायदा देऊ शकतो आणि घरातील कोणी आजारी पडल्यास महाराष्ट्रात राहणारी कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत 500000 रुपयांचे उपचार घेऊ शकते.उपचार सर्वोत्कृष्ट रुग्णालयात मोफत करता येईल...
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा