Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

साक्री शहरात पत्नीचा गळा चिरून खून,पतीचा ही विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न साक्री पोलीसांवर नातेवाईकांनी केले गंभीर आरोप



साक्री मध्ये पत्नीचा गळा चिरून खून करुन पतीचा ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना साक्री शहरातील गवळीवाडा येथे घडली आहे. उभंड येथे वास्तव्यास असलेल्या किरण मोरे यांचे पती पुरुषोत्तम मोरे सतत काही ना काही कारणाने पत्नी किरण यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असताना किरण ह्या आपल्या दोन मुली व एक मुलगा सह साक्री शहरातील गवळीवाडा येथे दहा दिवसांपुर्वी राहण्यासाठी आले होते. परंतु काल त्यांचे पती पुरुषोत्तम हे सायंकाळी पत्नी राहत असलेल्या घरात आले. त्या दोघांन मध्ये भांडण सुरु झाले असताना पतीने पत्नीचा गळाला चाकुने वार केले. व किरण ह्या जमीनीवर कोसळल्या व पतीने विषारी औषध प्राशन केले. किरण ह्यांना तात्काळ साक्री ग्रामीण रुणालयात दाखल केले असता डॉक्टरांनी किरण यांना मृत घोषित केले. व पतीला साक्री ग्रामीण रुणालयातुन धुळे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी साक्री पोलीसांन वर देखील गंभीर केले आहे की किरण घ्या घटना घडल्याच्या एक दिवस अगोदर साक्री पोलीस स्टेशनला पती विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु तेथे हजर असलेले पोलीस अधिकारांनी निजामपुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास सांगितले. व किरण हे निजामपुर पोलीस स्टेशनला गेले असता तेथेही त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. जर पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली असती तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटने मुळेही पोलिसांन वर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध