Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला पुन्हा एकदा धावल्या जळगाव जिह्याचा लोकप्रिय खा.रक्षा ताई खडसे



पीक विमा कंपनी कडून होणाऱ्या त्रासाबद्दल म्हणजेच,आधी विमा काढताना सर्व कागदपत्रे दिलेले असतांना पुन्हा तेच कागदपत्रे नव्याने विमा कंपनी च्या पोर्टल वर अपलोड करण्याच्या सूचना,अगोदर विमा काढताना जिओ टॅग चे फोटो दिलेले असताना सुद्धा परत नव्याने शेतात प्रत्यक्ष जाऊन फोटो काढणे या संदर्भात शेतकऱ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत होता, या संदर्भात शेतकऱ्यांनी ताईजवळ ही कैफियत मांडताच ताईंनी तत्काळ कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना योग्य तो पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांना काही कारण नसतांना विनाकारण अडचणी निर्माण करू नका असे सांगितले.
अश्या अडचणी प्रसंगी नक्कीच शेतकऱ्यांच्या मदतीला केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नेत्या रक्षा ताई खडसे या नेहमीच अग्रेसर राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात त्याबद्दल ताई आपले सर्व शेतकरी बांधवांकडून मनपूर्वक आभार..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध