Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
बोहरा मुस्लीम समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार! मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य;
बोहरा मुस्लीम समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार! मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य;
पंतप्रधान नरेंद्र मोदी (शुक्रवार, दि.१०) रोजी मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेन तसेच दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाच्या 'अल् जामिया तूस - सैफिया' या संकुलाचे उद्घाटन....करण्यात आले.मरोळ येथे बोहरा समाजाच्या संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले,माझे बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून नाते.तुमच्या कुटुंबातील एक सदस्यासारखा आहे.महिलांच्या शिक्षणासाठी या संस्थेचा नेहमी प्रयत्न असतो असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले.यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले,माझी बोहरा समाजाकडे एक तक्रार आहे.
तुम्ही कृपया त्यात सुधारणा करावी.
आपण मला नेहमी आदरणीय पंतप्रधान म्हणता.पण,मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे.मी इथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून नाही.माझे भाग्य असे आहे की,जे कदाचित फार कमी लोकांना मिळाले.मी चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. सर्व 4 पिढ्यांनी माझ्या घरी भेट दिली.मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्यासारखा असल्याचे देखील मोदी यावेळी म्हणाले.
पतप्रधान मोदी बोहरा समाजाचे कौतुक करताना म्हणाले की,बदलता काळ आणि विकासाच्या निकषावर बोहरा समाजाने नेहमीच स्वत:ला सिद्ध केले आहे.अल्जामिया-तुस- सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.परदेशातही गेल्यानंतर माझे बोहरा भाऊ-बहीण मला भेटण्यासाठी येतात असे देखील मोदी यावेळी म्हणाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा