Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ मार्च, २०२३

जिल्ह्यात महसूल अधिका-यांच्या अर्शिवादाने विना परवाना विटभाट्यांचा व्यावसाय सुरु...! स्वार्थ व आर्थकारणासाठी पर्यावरण व मानवी जिवनाशी मांडलेला खेळ कधी संपणार ?



शिरपूर प्रतिनिधी:-धुळे जिल्ह्यातील शिरपुर व शिंदखेडा तालुक्याचा विचार केलाच तर डोंगर व द-या-खो-यांचा असलेला भूभाग,अमरिशभाई पटेल यांच्या विकासरुपी महापुरुषाने भविष्याचा वेद घेत ठिक-ठिकाणी बंधारे बाधून अडविलेल्या पाण्यामुळे शिरपूर तालुक्यात उपलब्ध असलेले मुबलक पाणी, खेड्या-पाड्यांपर्यत जाण्यासाठी असलेले पक्के रस्ते, त्यातच बखंळ पाण्याचा स्त्रोत असलेली तापीमाई अश्या विविधतेने नटलेला शिरपूर तालुका.तर त्याच्य प्रमाणे शिंदखेडा तालुक्यात देखील आमदार रावल यांच्यामाध्यामातून स्वच्छ व प्रसस्त रस्ते,हाती घेतलेले छोटे मोठे प्रकल्प,दोंडाईचा शहराचा केलेला विकास व मुख्य रस्त्यांचा कायापालट,गावोगावी सर्वसामान्य जनतेपर्यत आपल्या कर्तूत्वाने पोहचलेली आपली ऒळख.यामुळे ही दोन्ही तालुके जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील महत्वाची तालुके आहेत.

मात्र,महसूल अधिका-यांच्या स्वार्थ व त्यांच्या.......
साठी,पर्यावरणाचा व मानवी जिवनाचा खेळ मांडगेला आहे. व हा खेळ नेमका केव्हा संपणार हा नागरिकांन समोर उभा असलेला प्रश्न आहे.खेडो-पाडी,व वहातुकीच्या दृष्टीने सोयीस्कर होइल अश्या पध्दतीने गावापासून अगदी जवळच व नदी अथवा नाल्याच्या अगदी काठावर, मुख्य रस्त्यास लागून मोठ-मोठ्या विटभट्या सुरु आहेत.या विटभट्याकडे शासनाच्या विविध स्तरावरील परवानग्या घेणे आवश्यक असते. तसेच या विटभट्यांना विटा बनविण्यासाठी लागणारा गाळाची अवश्यकता ते या नदी व नाल्यांच्या खोदकाम करुन भागवतात. महसूल अधिकारी देखील आपला लाक्षांक पुर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून गाळ रुपी गौण खनिजापोटी कर(रॉयल्टी) वसुल करते. व आपला लाक्षांक पुर्ण झाला असे दाखवते.ज्या वेळेला तालुक्यातील हे महसूल अधिकारी यांच्याकडून रॉयल्टी वसुल करतात त्यावेळेस यांच्याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवामगी आहे काय ? हे का तपासले जात नाही ? निसर्गाने दिलेली देणगी व स्थानिक विकास पुरुषाच्या प्रयत्नाने आजही आबादित असेलेले पर्यावरण व गौण खणीज यांच्याशी वेकायदा उपद्रव करणा-या विटाभट्टाधारकांवर तात्काळ गुन्हे का नोंदविले जात नाही ? पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत जात आहे.त्यांचा विपरित परिणाम हा मानवी जिवावर घातक असा परिणाम करित आहे. मग या मानवी जिवनाशी खेळणा-या विटभट्टाधारक व्यक्तीना एखाद्या अंतकवादीप्रमाणे मोक्का का लावला जात नाही ?

शिरपूरकडून शिंदखेडा जातांना शिरपूर शहराच्या अगदी हकेच्या अंतरावरच अरुणावती नदीच्या कडेला खर्दे व शिंगावे गावाला लागून सुरु असलेल्या विटभट्ट्या, सुलवाडे गावाजवळ रस्त्याच्या कडेला लागून मोठ मोठ्या चिमण्या असलेल्या या विटभट्ट्या जेव्हा पेटविल्या जातात त्यावेळेस कितीतरी मोठ्या प्रमाणात पर्यावरणात कार्बनडाय ऑक्साईड सारखे मानवि जिवनास घातक घटक हे वातावरणात सोडले जातात. मग येथिल स्थानिक अधिकारी यांवर नेमकी कार्यवाही का करत नाही ? हे असे किती दिवस चालणार ? तरी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिका-यानी याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा जनतेचा आपल्यावरील विश्वास एकदा क उडाला तर त्याचे परिवसन विद्रोहाकडे जाईल,व पर्यावरणप्रेमीचा संताप त्यावेळेस अंगावर घेण्याची शक्ती आपल्याकडे नसेल. याची दखल या अधिका-यांनी घेण्याची नितांत गरज आहे.व हेच वेळे अगोदर सुचलेले शाहणपण म्हणता येईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध