Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १६ मार्च, २०२३

शिरपूर उपविभागीय अधिकारी आसाराम आगरकर यांनी पोलीस दलाला अनमोल योगदान दिल्याने त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आले सन्मानित...



शिरपूर उपविभागीय अधिकारी आसाराम आगरकर यांनी पोलीस दलाला अनमोल योगदान दिल्याने त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आले सन्मानित...



शिरपूर प्रतिनिधी:-धुळे जिल्हा पोलीस दलासाठी आपण खालील नमुद केल्याप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करुन जिल्हा पोलीस दलास बहुमोल योगदान प्रदान केले आहे.यास्तव हे प्रशस्तीपत्र आपणास सन्मानपूर्वक देण्यात येत आहे.

कामगिरी - थाळनेर पो.स्टे गु.र.नं. ३० / २०२३ भादवि. ३०२, एका अनोळखी तरुणाचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मक्याच्या शेतात फेकून दिले.अज्ञात मयत व अज्ञात मारेकरी यांचा शोध होणे आव्हान होते परंतु आपण साक्षीदार गुप्त बातमीदार डम्पडेटा चे विष्लेशन व सी.सी.टी.व्ही फुटेज यांचा सांगड घालुन मयताची ओळख पटवून आरोपीतांना पोटबंदर गुजरात राज्यातून अटक करुन गुन्हा उघडकिस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

पोलीस अधिक्षक कार्यालय, धुळे.तारीख:14/03/2023
(संजय बारकुंड) I.P.S.पोलीस अधिक्षक,धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध