Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने साक्री तालुक्यात अवैद्य वृक्षतोड सुरूच....जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी जनतेची मागणी....
वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने साक्री तालुक्यात अवैद्य वृक्षतोड सुरूच....जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी जनतेची मागणी....
साक्री प्रतिनिधी:-धुळे जिल्ह्यासह साक्री सह पिंपळनेर परिसरातील तालुक्यात अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे. अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन कानाडोळा करत असतात खासगी तसेच राखीव वनक्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येते. काही स्थानिक नागरिक व काही वेळा वनविभागाची पडद्यामागची छुपी भ्रष्टाचारी मंडळी यामुळे ही समस्या ओढवली आहे.गेल्या वर्षांत हजारो वृक्षांची अवैधरीत्या तोड झाली आहे. यात साग,बाबळ खैर निंब,आंबा,या वृक्षांची सर्वात जास्त समावेश आहे अशा अनेक प्रकारच्या वृक्षाची मोठी तस्करी नेहमीच चालू असते; मात्र अनेक वर्षे जुने वृक्ष तोडले जात असल्याने तशी वृक्षराजी उभी करणे नजीकच्या काळात कठीण बनले आहे.
जिल्ह्यात व तालुक्यात अनेक राखीव वनक्षेत्र आहे.जिल्ह्याचा बराचसा भाग हा वनाच्छादित आहेत.जिल्ह्यातील एकूण भूभागाच्या जवळपास 60 टक्के भाग हा झाडे झुडुपांनी समृद्ध आहे.
यात खासगी व शासकीय राखीव वनक्षेत्रातील क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यात मालकी वनक्षेत्र असल्याने खाजगी व शासकीय वनक्षेत्रावर मोठी वृक्षतोड सतत होत असते.साक्री तालुक्यातील स्वामिल,विटभट्टी,
जळाऊ इंधन,व्ही आय पी फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड करण्यात येते.नजितच्याच काळात पिंपळनेर वन विभागाने दोन-चार मोठ्या कारवाया देखील केल्या आहेत जिल्ह्यातील एकूण भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर सागाचे व खैरचे वृक्ष मोट्या प्रमाणावर आहेत. डोंगरउतारावरील रचनेमुळे हिवाळ्याच्या उत्तरार्धात व उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना ही अलीकडच्या काळात साखरी तालुक्यात जास्त पहावयास मिळाल्या आहेत व नवीन वृक्ष लागवडी मोठ्या प्रमाणात होत असतात.परंतु पूर्वी लागवडी केलेले मोठी मोठी झाड वनव्याने जळायची आणि त्याच ठिकाणी साफसफाई करून नवीन खड्डे खोदून पुन्हा नवीन वर्षी नव्या झाडांची लागवड करायची आणि शासनाचे कोट्यावधी रुपये चा भ्रष्टाचार करायचा या सर्व अनधिकृत प्रकारामुळेच वनसंपत्तीचा ऱ्हास होतो आहे.
अशा नागरिकांच्या व वन विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे व त्यांच्या गलथान कारभारामुळे आगळ्या वेगळ्या गैरसमजामुळे आज तालुक्यातील बरीचसी जंगले उनाड होण्याच्या मार्गावर आहेत.साक्री तालुक्यातील अत्यंत वैभव संपन्न असे जंगल पिंपळनेर परिसरातील पश्चिम पट्ट्यात आहे परंतु वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे त्यातही मोठा ऱ्हास होण्याची चिन्हे दिसून येत आहेत साक्री तालुक्यात काळगाव,राहुड वारसा अशा अनेक परिसरातील वनक्षेत्रात स्थानिक लोकांकडून स्वार्थासाठी अशाच घटनांना अधिकाऱ्यांकडून वाव देण्यात येत आहे. दुसरे कारण म्हणजे वनविभागातील भ्रष्टाचारामुळे जंगलातील वृक्षसंपत्ती आज कमी होण्याच्या मार्गावर आहे.राखीव वनक्षेत्रात प्रामुख्याने अशा घटना अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने करण्यात येतात.यात संबधित परिसरातील काही वनपालापासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत हात असण्याचा अंदाज नागरिकांकडून लावण्यात येतो.साक्री तालुक्यातील साग खैर या वृक्षाला परजिल्ह्यात मोठी मागणी होत असते; मात्र वनविभागाच्या चौक्यावर होणारी निष्क्रिय तपासणी, देण्यात येणारा पास अशा बाबी महत्वाच्या असतात.याचा अडथळा दुर करण्यासाठीही बऱ्याच वेळा लाकुडपती व्यावसायिकांकडून मोठ्या आमिषांना बळी पडल्याचे प्रकार होत असतात.त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येऊन जिल्ह्यातील खाजगी तसेच शासकीय राखीव वनक्षेत्रातील वृक्ष संपती तोड करुन परजिल्ह्यात व परराज्यात जात आहे.
जिल्ह्याभरात खासगी वनक्षेत्रात स्वार्थासाठी यंदाच्या वर्षात यात साग, खैर निंब,आंबा अशा अनेक वृक्षांची तोड झाली आहे.तर खैराची झाडे,इतर वृक्षांची संख्या पाहता तब्बल हजारो डेरेदार वृक्षांची तोड केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वनाच्छादित क्षेत्र घटण्याचा धोका पर्यावरणाला निर्माण झाला आहे.तर राखीव वनक्षेत्रात वनपाल,वनमजुर यांची गस्ती असताना सुद्धा बेकायदा वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे यावर शासनाने लवकरच काहीतरी मार्ग काढून जंगल संरक्षणाचा कायदा कडक करण्याची गरज आहे.
जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी जनतेची मागणी
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा