Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १६ मे, २०२३
शिरपूरच्या दोन क्रिकेटपटूंना व्यावसायिक तत्त्वावर नियुक्ती...!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर,ता.४ : येथील तालुका क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेटपटू आनंद जगताप व प्रशांत ढोले यांना अनुक्रमे मुंबई येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया व रिलायन्स समूहाच्या अॅग्रिबीड कॉर्पोरेटमध्ये शिष्यवृत्ती तत्त्वावर व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून नियुक्ती देण्यात आली.
दोघेही बारा वर्षांपासून आर.सी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. आनंद जगताप याने शिरपूर तालुक्याकडून १४ वर्षांखालील महाराष्ट्र शालेय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले असून,प्रशांत ढोले याने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. दोघेही चार वर्षांपासून मुंबई येथे स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असून, त्यांच्या कौशल्यामुळे व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून नियुक्ती मिळाली आहे. या नियुक्तीमुळे त्यांना मुंबईतील टाइम शील्ड व विविध प्रतिष्ठित कॉर्पोरेट लीग स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
आनंद जगताप हा मधल्या फळीचा फलंदाज असून,लेग ब्रेक गोलंदाजीही करतो..प्रशांत ढोले सलामीचा डावखुरा फलंदाज आहे.त्यांना प्रशिक्षक संदीप देशमुख,राहुल स्वर्गे,पूजा जैन,कुणाल गिरासे,अनिकेत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या नियुक्तीचे आमदार अमरिशभाई पटेल,क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल,संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,सचिव प्रभाकर चव्हाण,वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे,क्रीडाप्रमुख प्रीतेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा,प्रा.विनय पवार यांनी स्वागत केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा