Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ मे, २०२३

शेतकऱ्यांना दिलासा : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर : मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय



मुंबई :- आज राज्याची राजधानी मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत, महत्वाचे म्हणजे अवकाळी पावसाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्चाच्या निर्णयाच्या कार्यवाहीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत ट्वीट देखील केलं आहे. सतत होणाऱ्या अवकाळी मुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, मोठ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना यामुळे करावा लागत आहे, शेतकऱ्याची हीच अडचण ओळखून राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.सतत चा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसान ग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या  नुकसानीची भरपाई लवकर मिळण्यास मदत होईल.

मंत्रिमंडळ बैठकीत इतर महत्वाचे निर्णय :-

आयटीआय कंत्राटी निर्देशाकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आलेले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलीय, कौशल्य रोजगार आणि उद्योजगता विभागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
तसेच अकोला येथे नवीन पशु वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलेले आहे.यासह उद्योग विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक अवकास व संरक्षण रेडीमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतीचे पुनर्विकास धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध