Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ मे, २०२३

व्हाईस ऑफ मिडिया शाखा रावेरच्या वतीने वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन डी वाय एस पी डॉ.कुणाल सोनवणे व तहसीलदार बंडू कापसे यांना दिले निवेदन...



रावेर प्रतिनिधी रावेर येथे व्हाईस ऑफ मिडिया शाखा रावेरच्या वतीने वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन डी वाय एस पी डॉ. कुणाल सोनवणे,तहसीलदार मा.बंडू कापसे व मा.पोलिस निरीक्षक,कैलास नागरे यांना आज दिनांक 11/5/2023 रोजी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते.मात्र  माध्यमांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत.आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्यांकडे आपले लक्ष वेधत आहोत. 


१) पत्रकारासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा.

२) पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी... 

३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.

४) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा 

५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे,

६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे.लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात.साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्यांसाठी आम्ही आज आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. 

तरी आपण आमच्या या मागण्या आपल्या मार्फत शासनाच्या स्तरावर पाठवाव्यात आणि आम्हाला आणखी तीव्र आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागू नये अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनावर तालुकाध्यक्ष वासुदेव नरवाडे, जिल्हा सदस्य मिलिंद टोके,दिलीप वैदय, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील,उपाध्यक्ष ईश्वर महाजन,प्रवीण पाटील, सचिव प्रवीण पाटील,जॉइंट सेक्रेटरी सुनील चौधरी,कोषाध्यक्ष कैलास लवंगळे, संघटन सचिव अनिल आसेकर, सदस्य- ज्ञानेश्वर महाजन,प्रदिप वैदय,किरण शेलोले निंबोल, चंद्रकांत विचवे,युसूफ खाटिक विवरे,रविंद्र महाजन, पंकज पाटील,विजय पाटील रावेर राजेंद्र अटकाळे पंकज पाटील,श्याम पाटील यांच्या यांच्या सहया आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध