Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ११ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांच्या विविध प्रलंभित मागण्यांसाठी करण्यात आले धरणे आंदोलन
साक्री तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांच्या विविध प्रलंभित मागण्यांसाठी करण्यात आले धरणे आंदोलन
व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांच्या मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण तसेच धुळे शहरात देखील हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे,
पत्रकारांच्या विकासासाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना करून त्यास भरीव निधी देण्यात यावा त्याचबरोबर पत्रकारांना घर मिळवून देण्यासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा, वृत्तपत्रांमध्ये छापून येणाऱ्या जाहिरातीवर लावण्यात येणारा जीएसटी रद्द करण्यात यावा, कोरोना काळात मृत पावलेल्या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकार बांधवांना सरसकट अधिकृती पत्रक देण्यात यावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिकांना मारक ठरत असून लघु दैनिकांना देखील ब वर्ग मध्यमवर्गीय दैनिकांप्रमाणेच जाहिरात देण्यात व सप्ताहिकांना देखील त्याच प्रकारे जाहिराती देण्यात याव्यात या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले असून आपल्या मागण्यांसाठी तहसील अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकार्यांना याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे, धुळे जिल्ह्याचे वाईस ऑफ मेडिया या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले असून प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील ना...
-
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा