Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ जून, २०२३

लाचेची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहात अटक



शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील लोकसेवेक गुलाब रामदास चौधरी,ग्रामसेवक,ग्रामपंचायत जामन्यापाडा,ता.शिरपुर,जि.धुळे यांनी तक्रारदार यांच्याकडे १४००/- रुपये मागणी लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात येवुन त्यांचे विरूध्द प्रतिबंधक विभाग यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तकारदार हे जामन्यापाडा ता.शिरपुर येथील रहीवाशी असुन त्यांच्या आत्याचा जन्म दि.०१.०५.१९६८ रोजी मौजे जामन्यापाडा,ता.शिरपुर येथे झाला असुन त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती.तकारदार यांच्या आत्याची जन्माची नोंद होणे करीता तकारदार यांची आत्याने शिरपुर येथील मे ज्युडीशिअल मॅजि.वर्ग०१ यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होणे करीता फौजदारी किरकोळ अर्ज नं ४७२ / २०२२ दाखल केला होता.सदर अर्जावर सुनावणी होवुन मा न्यायालयाने तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद घेणे बाबत दि.१४१०.२०२२ रोजी आदेश पारित केले आहेत.त्याप्रमाणे तकारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होणे करीता दि.०२.०६.२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय,जामन्यापाडा येथे जावुन मा.न्यायलयाच्या आदेशांची प्रत जोडुन अर्ज ग्रामसेवक गुलाब चौधरी यांच्याकडे जमा केला होता. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची नोंद घेवुन जन्म दाखला देण्यासाठी तकारदार यांच्याकडे १४००/- रूपये लेट फीच्या नावाखाली लाचेची मागणी केल्यांची दुरध्वनी द्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाचे पथकाने आज दि.०५.०६.२०२३ रोजी जामन्यापाडा, ता.शिरपुर येथे जावुन तकारदार यांची तक्रार नोंदवुन घेतली होती.
 
सदर तकारीच्या अनुषंगाने आज दि.०५/०६/२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या आत्याची जन्मांची नोंद घेण्यासाठी लेट फीच्या नावाखाली पंचसाक्षीदारा समक्ष १४००/- रु.लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम ग्रामपंचायत कार्यालय, जामन्या पाडा,ता.शिरपुर जि.धुळे येथे स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले त्या दरम्यान ग्रामसेवक चौधरी यांना ताब्यात घेते वेळी त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांना सापळा पथकाने योग्य बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
 
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे, श्री.मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील,मकरंद पाटील,प्रविण पाटील, प्रशांत बागुल, रोहीणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा.शर्मिष्ठा वालावलकर व वाचक पोलीस उप अधीक्षक मा.श्री.नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध