Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

रावेर येथे कांताई नेत्रालयाच्या वतीने 50 रुग्णांची तपासणी तर 11 रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया....!



रावेर ( प्रतिनीधी )दि.28 रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दिनांक 28 जुलै शुक्रवार रोजी कांताई नेत्रालयाच्या वतीने 50 रुग्णांची तपासणी करून 11 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.    
 
यावेळी कांताई नेत्रालयाचे  कॅम मॅनेजर युवराज देसरडा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करून माहिती दिली .कांताई नेत्रालयाचे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्र चिकित्सक डॉ.सुनिलसिंग व सहकारी विनोद पाटील यांनी 50 शिबिरार्थी तपासणी करून त्यापैकी 11 रुग्ण मोतूबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगाव येथे कांताई नेत्रालय हॉस्पिटलला पाठविण्यात आले. 

कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला म.गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम बारी, मयुर  गिरासे,प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील , बबलु शेठ नागरीया, पत्रकार सुनील चौधरी, खान्देश माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ महाजन, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे ,जयेश पाटील,यांच्यासह शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध