Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

धुळे जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ ॲड.ब्रविम महाले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड...!



वाघाडी प्रतिनिधी:-महाराष्ट्र आयोगामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग 1) पदी धुळे येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत विधीज्ञ ॲड.ब्रविम यशवंत महाले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून ही निवड करण्यात आली आहे.एम पी एस सी ने जानेवारी 2022 मध्ये सहा. सरकारी अभियोक्ता गट - अ पदाकरीता जाहिरात प्रसिद्ध केली होती.सप्टेंबर 2022 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली त्यात प्राविण्य प्राप्त केल्यानंतर मे 2023 मध्ये पुणे येथील यशदा येथे एम पी एस सी मार्फत पदाकरिता मुलाखती घेण्यात आल्यात.दोनही टप्यांमध्ये यशस्वीपणे प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर एमपीएससीने नुकतीच ॲड.ब्रविम यशवंत महाले यांची सरकारी वकील अभियोक्ता पदी निवड केली असून शासनाकडे नियुक्तीसाठी तशी शिफारस केली आहे. 

ॲड.महाले यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जुने धुळे येथील न्यु सिटी हायस्कूल, तर माध्यमिक शिक्षण महाजन हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण एस एस व्ही पी एस कॉलेजमध्ये  केले तर एम.ए.एलएल.बी चे शिक्षण देवपूर धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथे पूर्ण केले.

त्यानंतर सन 2006 मध्ये त्यांनी धुळे जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. त्यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्ता परीक्षेची तयारी सुरू होती.या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे.यात ॲड. महाले यांनी यश मिळविले.त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे.सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेसाठी मी अहोरात्र मेहनत घेतली व त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात मी हे यश संपादन करण्यात यशस्वी झालो असल्याचे मत ॲड.महाले यांनी व्यक्त केले.सदर यशाचे श्रेय त्यांनी आपले आईवडील व मित्र परिवाराला दिले. सदर यश संपादन करण्यास सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड.रणजित नगराळे यांचे विशेष असे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच ॲड.दिनेश पाटील,ॲड.निलेश कुलकर्णी व धुळे जिल्हा वकील संघातील ॲडव्होकेट यांनी वेळोवेळी सहकार्य करून मार्गदर्शन केले आहे.ॲड.ब्रविम महाले यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर  सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध