Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३

शिंदे गटातील आमदाराच्या मुलाची गुंडगिरी....! अपहरण व धमकीचा प्रयत्न...!



मुंबई गोरेगाव येथील धमकी व अपहरणाचा प्रयत्न गोरेगाव येथील व्यापारी राजकुमार सिंग याला शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाकडून राज सुर्वे यांनी व्यापाऱ्याला पाटणातील.एका मनोज मिश्रा नामक व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करण्या साठी राजकुमार सिंग याला राज सुर्वे यांनी आपल्या 10.12.साथीदार यांच्या कडून राजकुमार सिंग यांना त्याच्या ऑफिस मधून बंदुकीच्या धाक दाखवून दहिसर येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या ऑफिस मध्ये घेऊन आले. 

तिथे प्रकाश सुर्वे यांच्या मुलगा राज सुर्वे होता.त्यांनी पाटणा स्थित मनोज मिश्रा कडून घेतलेले कर्ज परत करावे म्हणून राज सुर्वे व त्याचे मित्र यांनी त्या व्यापाऱ्याला बंगुकीचा धाक दाखवत हे प्रकरण रफा दफा करण्यास सांगितले अशी धमकी त्यांनीं राजकुमार सिंग याला दिली.राजकुमार सिंग यांनी वनराई पोलिस स्टेशन मध्ये धमकी व अपहरणाची नोंद केलेली आहे.पुढील तपास वनराई पोलिस स्टेशन अधिकारी करतं आहे. 

तरुण गर्जना मुंबई प्रतिनीधी.श्रावण पाटील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध