Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
हस्ती बँक शाखा शिंदखेडाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी 17 रोजी हस्ती मधुमेह व रक्तदान शिबिर...!
हस्ती बँक शाखा शिंदखेडाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी 17 रोजी हस्ती मधुमेह व रक्तदान शिबिर...!
शिंदखेडा प्रतिनिधी : दि हस्ती को. ऑफ बँक च्या शिंदखेडा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी हस्ती मधुमेह तपासणी व मार्गदर्शन शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थापक अध्यक्ष स्व. हस्तीमल जी जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती बँक तर्फे विविध उपक्रम राबविले जातात.स्व. कांतीलाल जी जैन यांनी 33 वर्षां पूर्वी बँकेची दुसरी शाखा शिंदखेडा येथे स्थापन केली आज त्या शाखेच्या 34 व्या वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने धुळे येथिल साई हॉस्पिटल चे डॉ.संदीप भावसार हे मधुमेह या विषयावर जागृती आणण्यासाठी मार्गदर्शन व मोफत मधुमेहच्या तपासण्या करणार आहेत तसेच रक्तदान शिबिरासाठी नवजीवन रक्तपेढीचे डॉ. सुनिल चौधरी व त्यांच्या टीम चे सहकार्य लागणार आहे.
रक्तदान हे सामाजिक कर्तव्य आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनीं रक्तदान करावे तसेच हस्ती मधुमेह शिबिराचे लाभ घावा असे आवाहन बँकेचे चेअरमन कैलास जैन, व्हा.चेअरमन डॉ. दिलीपकुमार चोरडिया, संचालक प्रा.जितेंद्र पाटील,शिंदखेडा शाखा समिती चेअरमन ऍड.अशोक गुजराथी, व्हा.चेअरमन अनिल वानखेडे , सर्व समिती सदस्य व शाखा व्यवस्थापक चंन्द्रेश शर्मा व स्टाफ यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा