Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे हे काय दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले, शिरपूर तालुक्यातील भेसळयुक्त दुध रोखण्यासाठी प्रशासन दाखल....!
अरे बापरे हे काय दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले, शिरपूर तालुक्यातील भेसळयुक्त दुध रोखण्यासाठी प्रशासन दाखल....!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील भेसळयुक्त दुध रोखण्यासाठी प्रशासनन सज्ज असून जिल्ह्यातील पथकाने आज शिरपूरातील काही दुध डेअरींवर धाड टाकली आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून यात अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि वजनमाप विभागाचे अधिकारींचे पथक तयार करण्यात आले आहे.
धुळे शहरात काही दिवसांपासून भेसळयुक्त दुध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई सुरु असून यात अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि वजनमाप विभागाचे अधिकारी व कर्मचारींचा समावेश आहे.धुळे शहरात आतापर्यंत मोठ्याप्रमाणात भेसळयुक्त दुधांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे.
मात्र पथकाने आता शिरपूर तालुक्याकडे मोर्चा वळवला असून जिल्हा दुग्ध विकास व्यवसाय अधिकारी विजय गवळी,डॉ अमित पाटील, विस्तार अधिकारी प्रितेश गोंढळे,अन्न व औषध प्रशासन विभागातील बावीस्कर, भावसा,
वजनमाप अधिकारी बि एन आरुळे, के, डी, पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, संदीप माळी, यांच्या पथकाने काल सायंकाळी अचानक शिरपूर फाटा येथील दुध डेअरींवर धाड टाकली. यावेळी दुधाची गुणवत्ता, डेअरीवर दुध घेऊन येणाऱ्यांच्या कॅन मधील दुधाची गुणवत्ता व त्यासोबत दुधापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची तपासणी करण्यात आली. कार्यवाहीला सुरूवात झाली असून दुधाच्या तपासणी नंतर येणाऱ्या अहवालात भेसळयुक्त दुधाची माहिती मिळणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा