Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
वाळू माफियांना तहसिलदार समाधान सोनवणे यांचे अभय...! शेगाव तालुक्यामध्ये वाळूची तस्करी जोरात सुरू....!
वाळू माफियांना तहसिलदार समाधान सोनवणे यांचे अभय...! शेगाव तालुक्यामध्ये वाळूची तस्करी जोरात सुरू....!
शेगाव प्रतिनिधी:उमेश राजगुरे :-
शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठले असलेल्या गावातून अवैध रेतीचा उपसा जोरात चालू असून पूर्णा नदी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांनी खूप मोठे गड्डे खोदलेले आहेत. व नदीपात्रातच रेतीचे मोठे मोठे गंज गाळून ठेवलेले आहेत. या विषयाकडे शेगाव महसूल काना डोळा करत असून अवैध रेती वाहतूकदारांना शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांचा अभय व आश्रय असल्याची दिसून येत आहे.
त्यामुळे हे अवैध रेती वाहतुकीचे वाहने भर दिवसा शेगाव संत नगरीतून वाहतूक करताना दिसत आहेत. याकडे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करून शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांची कान उघडणे व डोळे उघडणे करून संत नगरीतील अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करावी.शेगाव तालुक्यामध्ये रेतीची तस्करी खूप जोराने चालू असल्याकारनास्ताव शेगाव वरवट मार्गाने जाणाऱ्या टू व्हीलर वा फोर व्हीलर गाड्यांची अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे अंदाधुंद अवस्थेमध्ये बिना नंबर प्लेट तसेच तहसीलदार यांचे स्थाननिश्चिती घेऊन गाड्या चालवल्या जातात.स्थाननिश्चिती बिघडल्यानंतर ते जागेवरच आपले गाडीतील वाळू रस्त्यावर खाली करतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.६ सप्टेंबर रोजी सात वाजता एक भल्या मोठ्या ठिकाणी वाळूची गाडी गौरव बारच्या जवळ रस्त्यामध्ये खाली केल्याने,त्या ठिकाणी जवळपास दहा मोठे अपघात अवघ्या १५ मिनिटांत एकच वेळेस झाले.त्यातील जखमी व गंभीर जखमी रुग्णांना सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले काहींना अकोला हलवण्यात आले तर काहींना शेगाव येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले.
शेगाव वरवट रोडवर या भल्या मोठ्या रस्त्यात असलेल्या वाळूने झाले.त्या मध्ये गंभीर गाताना अशी की,भगवान बिल्लेवाल व त्यांची पत्नी हे दोघेजणे शेगाव येथे दर्शनासाठी गेले असता गौरव बारच्या जवळ महिला दोखे जण वाळू मुळे गदिघसरली आणि ते दोघे जण तेथे पडले.त्यामध्ये महिलेला पोटाला मार लागल्याने त्यांचा श्वास रोखला होता.त्यांना आधी शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.नंतर नागरगोजे खाजगी रुग्णालय येथे नेण्यात आले.महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्या महिलेला माऊली खाजगी रुग्णालय शेगाव येथे नेण्यात आले.आता त्या महीलेलची प्रकृती ठीक असल्याने बोलल्या जात आहे..
कोड ---जानु दाभाडे पाडसुळ येथील नागरिक -
तालुक्यातील नदीकाठाजवळील गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे. मात्र, त्याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे. आर्थिक संबंधातून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप जानु दाभाडे यांनी केला.पूर्णा नदीपात्रातील कोणत्याही घाटाचा लिलाव शासनाकडून झाला नाही.अवैध रेतीउपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
अवैध वाळू उत्खनन होत असल्या कारणास्तव स्थाननिश्चिती करून वाहन मालक आपल्या गाड्या चालवत असतात. परंतू सामान्य नागरिकांना अशा अपघातांचा सामना करावा लागतो याला कुठेतरी आळा बसण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार समाधान सोनवणे यांचा कान डोळा उगडे करणे आवश्यक आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा