Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

शिरपूर: शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी स्थपान करण्यात आलेली दि. शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँक लि. बँकेच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारा विरूध्द सभासदांतर्फे वरिष्ठ स्तरावर चौकशीची मागणी केलेली आहे. या बँकेचे ७००० भागधारक सभासद असून साधारणतः १०० कोटींपेक्षा ही जास्त ठेवी सभासदांनी ज्या संचालक मंडळ व बँकेच्या कर्मचारी यांच्यावरील विश्वासाने ठेवल्या आहेत. त्याच विश्वसाला तडा जाईल असे कृत्य या बँकेच्या चेअरमन व मॅनेजर यांनी केलेले आहे. चालू ५ वर्षात संचालक मंडळाने व विशेष करून चेअरमन यांनी मनमानी कारभार करून सभासदांची फसवणुक केली आहे. अनेक प्रकारची कर्जे असुरक्षित विनातारणी व बेकायदेशिरपणे नियमबाह्य कर्ज वितरीत केली आहे. त्यामुळे कर्ज वसूल न होता बँकेचा दरवर्षी एन.पी.ए. सतत वाढत जावून मागील ३ वर्षापासून मर्चट बँक 'क' वर्गात आहे. असे बँकेच्या लेखापरिक्षकांनी अहवालात शेरा नोंद केलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रामुख्याने बँकेचे विद्यमान चेअरमन व मॅनेजर हे आहेत असे दिसून येते. असे बँकेच्या तक्रारदार संचालक व सभासदांनी म्हटलेले आहे. बँकेच्या १३ संचालकांनी ९ ऑगस्ट २०२३ रोजी धुळे जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार देऊन मॅनेजर व चेअरमन यांच्यावर अविश्वास दाखविलेला आहे. चेअरमन हे स्वतः वेगवेगळ्या सभासदांच्या नावाने मोठे कर्ज विनातारणी व बेकायदेशिरपणे कोटयावधी रूपये स्वतः वापरत असल्याची चर्चा आहे. यालाच म्हणतात कुंपणानेच...... खाले. रिझर्व बँक आणि सहकार खात्याचा कायदा उपविधी व नियमावलीप्रमाणे बँकेच्या कारभार न चालवता मनमानीपणे एखाद्या खाजगी
सावरकाराप्रमाणे बँकेचा कारभार सुरू असलेला दिसून येते. सभासदांना मागील ५ वर्षापासून १ ही डिव्हिडंड न देता सदरहु बँकेत सर्वसामान्यांच्या ठेवीवर काही मोजके धनदांडगे व त्यांचे हितसंबंधी मंडळी मजा करीत आहेत. सहकार कायद्यानुसार संचालक मंडळाच्या रक्तनात्यातील कोणत्याही व्यक्तीस बँकेतून कर्ज देता येत नाही. तरीही अशी प्रकरणे आपल्या या बँकेद्वारे केलेली जागरुक सभासदांच्या निर्दशनास आलेली आहे. यात चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांनी जुलै २०२३ मध्ये त्यांचे बंधू हर्षद जयराज जैन यांना विनातारणी ३० लाख कर्ज दिलेले आहे. व यासंबंधी धुळे जिल्हा उपनिबंधकांपासून ते वरिष्ठ स्तरावर पर्यत तक्रार सुध्दा केलेल्या आहेत.

सहकार खात्याच्या नियम व कायद्याप्रमाणे सहकारी बँकेला लेखा परिक्षकांद्वारे लेखापरिक्षण अहवालात दिलेल्या दोषांवर मुदतीचा आंत दरवर्षी दोष दुरूस्ती अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करणे बंधनकारक असतांना सुध्दा बँकेने आजपर्यंत एकही दोषदुरूस्ती अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केलेला नाही. सर्वात मोठी व अतिगंभीर  असतांना सुध्दा जिल्हा उपनिबंधकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दि. शिरपूर मर्चंटस् ऑप बँकेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यातच तक्रारी दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर यांना चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे. याचाच जो पर्यंत कोणी तक्रार देत नाही तो पर्यंत तु काही बोलला नाही, व मी काही बघितले नाही. अश्या प्रकारे पडमथीपणाचे धोरण सहकार खात्यांच्या अधिकाऱ्यांनी  अवलंबीलेले आहे काय ? २-३  दिवसापुर्वी खुद्द मनोज चौधरी जिल्हा उपनिबंधक धुळे हे प्रत्यक्ष बँकेला भेट दिली मात्र कोणालाही बोलविले नाही? खुद्द तक्र यांना व इतर संचालकांना ? अतिशय गुप्तपणे चर्चा करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्याही कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आता तरी सभासदांनी जागरूक होणे गरजेचे आहे. बँक वाचवणे हे सभासदांच्या हाती असून येत्या 24 सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक साधारण सभेत या प्रश्नाच्या जॉब विचारून बँक वाचवण्यास सहकार्य करावे असे आव्हान बँकेचे जागरूक सभासदाकडून करण्यात येत आहे. त्याकरता निकट भविष्यात शिरपूर मर्चंट बँक बचाव समिती स्थापन करण्यात येईल पत्रकार परिषद मोहन साहेबराव पाटील ओंकार आबा जाधव गोपाल मारवाडी भरत रोकडे उपस्थित होते.

यातील अतिशय महत्त्वाचे समोर आलेले प्रश्न १) चेअरमन यांनी त्यांच्या भावाला तीस लाख रुपये विनाकारणी कर्जत का व कसे दिले ?२) मागील तीन वर्षापासून संस्था क वर्गात आहे. यास नेमके जबाबदार कोण ? चेअरमन की  कर्मचारी? ३) मागील पाच वर्षातील लेखापरीक्षषण  अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल का सादर केला नाही? याला जबाबदार कोण ?४) शासन वेळोवेळी दोष दुरुस्ती अहवाल मुदतीस सादर करण्याबाबत आदेशित करत असताना बँकेने मागील किती वर्षापासून दोष दुरुस्ती दिलेला नाही ? म्हणून त्यांच्यावर सक्तीची कारवाई का केली नाही ? कोणाच्या दबावामुळे ति टाळली ? ५) मागील तीन वर्षातील भाग अ मधील अति गंभीर मुद्दे व शेरे कोणते ?  व भाग क मधील शेरे कोणते ? याच्या खुलासा व्हावा  ६) मागील तीन वर्षातील एन.पी.ए.किती ? व तो कमी करण्यासाठी चेअरमन व मॅनेजर यांनी काय प्रयत्न केले? ७) संचालक मंडळांने त्यांची जबाबदारी पूर्ण केली नाही ? मग त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली नाही. याची उत्तरे निबंधाकडे संस्थेने व संस्थेच्या सभासदांनी उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागणी करावी असे आव्हान प्रेस नोट द्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध