Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
"बुलंद आवाज पत्रकार संघाच्या" राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी श्रीमती सुनिता तोमर यांची निवड...
"बुलंद आवाज पत्रकार संघाच्या" राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी श्रीमती सुनिता तोमर यांची निवड...
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
देशातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणारी बुलंद आवाज पत्रकार संघाच्या वतीने देशभरात महत्त्वाच्या अभ्यासू पत्रकारांची पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.यात श्रीमती सुनिता तोमर (पुणे महाराष्ट्र) यांची राष्ट्रीय संस्थापक महिला अध्यक्ष पदी दोन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
त्याबाबतचे नियुक्त पत्र "बुलंद आवाज पत्रकार संघाचे" राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्रीमान कैलासजी गर्दे यांनी श्रीमती सुनिता तोमर यांना दि.१ जानेवारी २०२३ रोजी नियुक्त पत्र दिलेले आहे. श्रीमती सुनिता तोमर यांनी आज पर्यंत देशातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एक वैचारिक लढा उभा केलेला आहे.
व पत्रकारांसाठी सुरू असलेले त्यांच्या कार्याची दखल घेत सदरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्रीमती सुनिता तोमर यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने त्यांच्या स्नेही बांधवात आणि पत्रकार संघाच्या देशभरातील सदस्यांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. दिलेल्या पदाला ते न्याय देतील असे संघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासजी गर्दे यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा