Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १६ जानेवारी, २०२४
जितेंद्र ढोले यांना युवक प्रेरणा प्रदान...!
धडगाव प्रतिनिधी :- युवकमित्र परिवार" संस्था महाराष्ट्रतर्फे राष्ट्रीय युवक दिनानिमित्त दिला जाणारा या वर्षीचा "राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार-२०२४ राज्य युवा परिषदेचे अक्राणी तालुका समन्वयक चि. जितेंद्र दिलीप ढोले यांना पुणे येथील पत्रकार भवन येथे महाराष्ट्र राज्याचे वनविभागाचे सेवानिवृत्त महावनरक्षक रंगनाथ नाईकडे,बुक क्लब चे संस्थापक अविनाश निमसे,मंथन फाउंडेशनच्या संस्थापिका आशा भट्ट,जय अंबामाता स्वयंरोजगार संस्थेच्या अध्यक्षा मंगला नागुल,सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचे, सचिन म्हसे,ह.भ.प.समाज प्रबोधन आळंदीचे प्रल्हाद डांगे,युवक मित्र परिवाराचे अध्यक्ष प्रविण महाजन इ.मान्यवरांचा उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
जितेंद्र ढोले यांनी केलेल्या कार्याची दखल यापूर्वीही नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार,जय भोईराज भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश,आदिवासी जनजागृती टिम अक्राणी, वन्य जीव बचाव संस्था नंदुरबार,भोई समाज सेवा संघ नंदुरबार इ.संस्थांनी घेतली आहे.जितेंद्र ढोले यांना सामाजिक कार्यासाठी ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड प्रस्तुत "INDIAN EDUCATION EXCELLENT AWARD 2024 साठीहि प्रस्ताव मागविण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा