Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ जानेवारी, २०२४
साक्री पंचायत समितीच्या मुजोर कर्मचाऱ्यांना सिईओ शुभम गुप्ता लगाम लावणार का ?
धुळे प्रतिनिधी - साक्री पंचायत समितीत पंधरा ते विस वर्षापासुन ठाण मांडून बसलेल्या मुजोर कर्मचाऱ्यांना लगाम बसेल का असा सवाल सर्वत्र होत आहे. कुणाच्या कृपा आशिर्वादाने ऐवढे वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडुन बसले आहेत.सर्वसामान्य शेतकरी व जनतेला वेठीस धरण्याचे काम हे मुजोर कर्मचारी नेहमी करत असतात. विविध प्रकारच्या योजनान पासुन गोरगरीब लोकांना वंचित ठेवण्याचे काम करत आहेत, पैसे घेतल्या शिवाय काम करत नाहीत.विविध गावांनमध्ये एजंट मार्फत पैसे गोळा करून घेतात आणि सर्व साधारण शेतकरी व नागरिकांना बोलता की,आम्ही येथे अनेक वर्षापासुन आहोत,आमचे कोणी काही ही वाकडे करणार नाही. आम्ही वरती पर्यंत पैसे पुरवतो आमची बदली काय कुठल्याही प्रकारची कारवाही देखील होणार नाही असं या मुजोर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते.सिंचन विहीर व गाय गोठे मंजुरी मिळवून एक वर्षे झाले असून मात्र अद्याप अनेक लाभार्थ्यांना वर्कऑर्डर मिळाली नाही. लाभार्थी दररोज पंचायत समितीच्या चक्रा मारत असतात, काही लाभार्थ्यांचे गोठे बांधकाम पूर्ण होऊन देखील त्यांना पेमेंट मिळत नाही. तालुक्यात अनेक गावांमध्ये विहिरींचे कामे चालू झाले आहेत.निम्मे काम होऊन देखील अद्याप एकही मस्टर पडले नसून शेतकरी आर्थिक विवंचनेत त्रस्त झालेला आहे. शासनाच्या घोषणा म्हणजे बोलाचा भात व बोलाची कढी दिसत आहे.शासन आपल्या दारी योजना फेल ठरत आहे शासनाच्या दारी येऊन कामे होत नाही शासनाच्या जाहिरात वर कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे शेतकऱ्यांना देशाधडील लावण्याचे काम चालु आहे.या अनुषंगाने साक्री पंचायत समितीच्या सर्वच विभातील पाच वर्षे पुढील कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या करण्यात याव्या अन्यथा दि. 26 जानेवारी नंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साक्री तालुका अध्यक्ष श्री.गिरीश विश्वासराव नेरकर यांच्याकडून देण्यात आला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा