Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
त्रस्त जनता मस्त अधिकारी आरटीओ विभागाचा डोळे झाक कारभार.... फ्लाईंग स्कॉडला ड्युटी लावण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये लागते स्पर्धा...!
त्रस्त जनता मस्त अधिकारी आरटीओ विभागाचा डोळे झाक कारभार.... फ्लाईंग स्कॉडला ड्युटी लावण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये लागते स्पर्धा...!
शिरपूर प्रतिनिधी - हाडाखेड येथील R.T.O चे प्रवेशद्वार (चेकपोस्ट) भ्रष्टाचाराने बरबटले आहे. येथील ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्याचे वर कमाईचे आकडे डोळे फिरविणारे असतात. म्हणून चेकनाक्यावर ट्युटी लावण्यासाठी हे अधिकारी धडपत आसतात तर फ्लाईंग स्काडमध्ये ड्युटी लावण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चागली कमाई होते फलाईंग स्क्वॉडमध्ये ड्युटी लावण्यासाठी गर्दी का केली जात...? सगळे पैशांसाठीच सुरू आहे.असे चित्र दिसते.ड्युटी केवळ पैशांसाठीच करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.त्यामुळे आरटीओ विभागाला काळीमा लागली आहे.
मुख्य आरटीओ याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ड्युटीवर असलेले अधिकारी व त्यांचे पंटर यांचीच चलती असते. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूरजवळील चेकनाक्यावर तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनालाच पाचशे रूपयांसाठी या अधिकाऱ्याच्या खासगी पंटरने अडविले होते.यातून पंटरांचा सुळसुळाट किती झाला आहे हे दिसून येते धुळे शहर कार्यालयातून तीन जिल्ह्यांच्या आरटीओचे काम सुरू असते तसे जळगाव जिल्ह्यातील पूरनाड व रावेर तालुक्यातील चेकनाक्यांवरही अधिकाऱ्यांची मनमानी दिसून येते. जळगाव जिल्ह्यातून शाम लोही यांचे प्रकरण तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीसाठी गेले आहे. कमाईपेक्षा जास्त संपत्ती जमविल्याचे हे प्रकरण आहे. याच प्रकरणात धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील काही अधिकारीही येतात. हाडाखेड चेकनाका हा मध्यप्रदेशसाठी महाराष्ट्राच्या सीमेवरील प्रवेशद्वार आहे.
पण या प्रवेशद्वारावर तपासणीच्या नावाखाली बरेच काही होत आहे. आता पैसे कमविण्याचे नवे साधन म्हणून प्लाईंग स्क्वाडचा फंडा आला आहे. या पथकात आरटीओ ड्युटी लावण्यासाठी कोणत्याही स्थितीवर जातात या साठी डीमांड मोठी असली तरी त्यासाठी आता स्पर्धाही होत आहे.मग आरटीओ विभाग सुधारणार तरी कधी ? असा प्रश्न निर्माण होतो. धुळे जळगाव नंदुरबार मध्ये आरटीओचा कारभार जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत वाहनचालकांना त्रास सहन करावाच लागेल का ? याकडे परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आयुक्त व मंत्री महोदय याकडे जातीने लक्ष देतील का असा प्रश्न वेगवेगळ्या वाहतूकदार व वाहन चालक संघटना यांनी उपस्थित केला आहे.
हाडाखेडच्या चेकनाक्यावर वाहनचालकांचे आर्थिक लुबाडणूक थांबत नाही.अधिकाऱ्यांच्या अवैध वसुलीचे केंद्र झालेली एक खिडकी योजना व लाल डायरी योजना कधी बंद होतील या सर्व पैसे लाटण्याची योजना झाली आहे असे दिसून येते धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील चेक पोस्ट आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांसाठी हे कुबेराचे दार आहे असे बोलले जाते.ट्रक चालकांवर तसेच मालकांवर इंधन महागाईचा बोजा पडत असताना दुसरीकडे परिवहन अधिकाऱ्यांचे अवैध वसुलीमुळे ट्रक चालकसुद्धा आर्थिक रित्या त्रासले आहेत राज्याचे मुख्यमंत्री हेच परिवहन मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे मात्र हा विभाग सुधारणार नसेल तर शेवटी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरू शकते याचे जबाबदार अधिकाऱ्यांनी बान ठेवावे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा