Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना लोकप्रतिनिधी भेट, मुख्याध्यापकच गैरहजर....!
शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना लोकप्रतिनिधी भेट, मुख्याध्यापकच गैरहजर....!
शिरपूर (प्रतिनिधी)शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना शिरपूर पंचायत समितीचे सभापती लताबाई वसंत पावरा व उपसभापती विजय बागुल, पंचायत समिती सदस्य राहुल पावरा, विजय खैरनार आदींनी अचानक भेट दिली. यावेळी अनेक शाळांवर मुख्याध्यापक गैरहजर होते तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम आढळून आली. खंबाळे येथे सुरू असलेल्या शिक्षण परिषदेत एकही शिक्षक मिळून आला नाही.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की पंचायत समितीच्या मासिक बैठकीत आदिवासी भागातील लोकप्रतिनिधी तक्रारी करतात आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेकडे फिरकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे. त्या अनुषंगाने शिरपूर पंचायत समितीचे सभापती सो.लताबाई वसंत पावरा यांचे प्रतिनिधी वसंत मांगु पावरा, उपसभापती विजय बागुल, पंचायत समिती सदस्य विजय खैरनार व राहुल पावरा आदींच्या पथकाने अचानक धारबर्डी,जुने सांगवी, पनाखेड, पळासनेर, हेनद्रापाडा चारणपाडा आधी गावातील जिल्हा परिषद शाळांना अचानक भेट दिली. धारबर्डी शाळेतील शिक्षक आनंदा रघुनाथ गायकवाड यांची अर्जित रजा संपल्यावरही ते शाळेत हजर झालेले नव्हते. हालचाल रजिस्टर वर नोंद नव्हती. विद्यार्थी पटसंख्येच्या निम्मीही विद्यार्थी हजर नव्हते. या गावात अंगणवाडी १०.४५ वाजता बंद झाली होती. जुनी सांगवी शाळेतील मुख्याध्यापक बँकेचे नाव करून गायब झाले होते. विद्यार्थी संख्या खूपच कमी होती. पनाखेड शाळेतील मुख्याध्यापक मनोहर दत्तात्रय पवार अर्जित रजा टाकून गायब होते. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना देखील नव्हती. या ठिकाणी शिक्षक गप्पा मारत होते व विद्यार्थी पटांगणावर फिरत होते. या शाळेवर विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्यानंतर घरी पाठवलं जात असल्याची माहिती पालकांनी दिली.पळासनेर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर होते शिक्षक राजेंद्र पाटील व छाया माळी यांचे अर्जित रजेचे अर्ज मुख्याध्यापकाच्या बॅगेत असल्याचे त्यांनी सांगितले. पळासनेर शाळेत मुख्याध्यापक मिळून आले नाही. शाळेत हालचाल रजिस्टर वर नोंद नव्हती. लोकप्रतिनिधी शाळेत पोहचल्यावर शिक्षक शिक्षिका गप्पा मारत बसले होते व विद्यार्थी इकडे तिकडे फिरत होते. चारनपाडा शाळेत तीन पैकी एक शिक्षक हजर होते या शाळेत घाणीचे साम्राज्य दिसून आले विद्यार्थी हजेरी पटाच्या निम्मे मिळाली. या शाळेतील शेरेबुक वरून विस्तार अधिकारी नीता सोनवणे १३/१२/२२ पासून शाळेत आलेल्या नव्हत्या. सदर शाळा हायवे पासून हाकेच्या अंतरावर आहे.
वरील शाळांवर केंद्रप्रमुख ही ४/५ महिन्यापासून आलेले नाहीत. या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही मिळून आली नाही. आदिवासी भागात अनेक शिक्षक शाळेवर जात नसल्यासे वास्तव्य दिसून आले.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्यांवर शैक्षणिक चर्चा व्हावी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढववी म्हणून शासनाने शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते.आंबे केंद्राचे शिक्षण परिषदेचे आयोजन खंबाळे येथे दुपारी १२ते३ वाजेपर्यंत करण्यात आले होते. या शिक्षण परिषदसाठी २० शाळेतील ५० शिक्षक उपस्थित असणे आवश्यक होते. परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधी २.१५ वाजता पोहोचले असता एकही शिक्षक मिळून आला नाही. आदिवासी भागात अनेक उपक्रम शाळेत बोगस राबवले जात असल्याची वास्तव लोकप्रतिनिधीना दिसून आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील जामनेपाणी गावाच्या अतिदुर्गम वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी उभारलेल्या अवैध गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांन...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर वकील संघाच्या निवडणुकीत अँड. प्रल्हाद महाजन यांनी अक्षरशः झंझावाती कामगिरी करत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. नि...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा