Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४
श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा घेरापालगड-किल्लेमाची
खेड :अक्षय कदम /राजेश शिबे
सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही किल्लेमाची घेरापालगड किल्ल्यावर सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकदम उत्सहात पार पडली. हा किल्ला खेड तालुक्यातील घेरापालगड ( किल्लेमाची) या गावामध्ये येतो.गडावर किल्लेमाची ग्रामस्थ व मुंबई मंडळ आयोजित शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.पहाटे ५ वाजल्यापासून आलेल्या शिव भक्तांचे स्वागत करण्यात आले. महाराजांचे सिंहासन व घुमट फुलांचा माळांनी व जागोजागी लावलेल्या झेंड्यानी परिसर सजविण्यात आला होता. गडावर शिवअभिषेक व सत्यनारायण पूजा पार पाडण्यात आली. दापोली-खेड-मंडणगड चे माननीय आमदार श्री. योगेश दादा कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. माननीय आमदार योगेश दादा, सभापती चंद्रकांत कदमजी , खेड तालुका प्रमुख सचिन जी धाडवे साहेब,पदाधिकारी व सहकाऱ्यांनी आलेल्या तमाम शिव भक्तांचे मार्ग दर्शन करून घेरापालगड गडासाठी व गडाच्या सुरक्षेसाठी लागणारी आवश्यक मदतीचे आश्वासन देत पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आजूबाजूच्या गावामधून आलेल्या तमाम जनतेने मोठ्या जल्लोषात लेझिम पथकाच्या नाचत गाजत मिरवणुकीचा आनंद लुटला.तसेच किल्ल्यावर ध्वजा वंदन करण्यात आला. शिवशाहीर श्री. विठोबा साळवी यांनी गायलेल्या पोवाड्याने संपूर्ण गड दुमदुमला.दुपारी किल्लेमाची येथील मारुती मंदिरात महाप्रसादाचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.आलेले सर्व भाविक मंत्रमुग्ध होवून कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे आस्वाद घेत होते. किल्लेमाची गावापासून ते गडावर केलेल्या सुरक्षा व नियोजनासाठी किल्लेमाची ग्रामस्थ व मुंबई मंडळाचे हार्दिक अभिनंदन.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा