Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ मार्च, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिक्षकानेच केले मुलींचे नको ते फोटो व्हायरल, दहिवेल महाविद्यालयातील संतापजनक प्रकार
शिक्षकानेच केले मुलींचे नको ते फोटो व्हायरल, दहिवेल महाविद्यालयातील संतापजनक प्रकार
धुळे प्रतिनिधी :- साक्री तालुक्याच्या दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील एका शिक्षकाने महाविद्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर मुलींचे नको ते फोटो व्हायरल करून आदिवासी मुलींची बदनामी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकाराला महिना उलटला तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या नेतृत्वाखाली आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी धुळे येथे सायबर क्राईम पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात साक्री तालुक्यातील आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत.त्यांची निवास व भोजन व्यवस्था शासकीय आदिवासी वस्तीगृहात करण्यात आली आहे.
''काय आहे नेमके प्रकरण''
9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमाराला ‘इयत्ता अकरावी सायन्स ग्रुप’‘ साक्री तालुका आमदार ग्रुप’,‘बल्हाने ग्रुप’ या वेगवेगळ्या ग्रुपवर मुलींचे अश्लील फोटो व्हायरल झाले.धक्कादायक म्हणजे फोटो व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, चक्क उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचा शिक्षक अविनाश भटू पाटील होता.त्याने त्याच्या व्हाट्सॲप क्रमांकावरून अत्यंत बीभत्स,घाणेरडे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून आदिवासी मुलींची प्रतिमा कलंकित केली.केवळ आदिवासी समाजातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे.या महाशयांचे हे कृत्य नेहमीचे आहे.
यापूर्वीही असे प्रकार त्यांनी केले आहेत.विकृत मनोवृत्तीचे हे शिक्षक समाजासाठी कलंक आहेत.
वसतिगृहाच्या महिला वाॅर्डनची बघ्याची भूमिका दहिवेल येथील शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहाच्या गृहपाल श्रीमती रीना जाधव यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
वसतिगृहाच्या गृहपाल म्हणून मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे.त्यामुळे हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी लगेच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते.परंतु त्यांनी याबाबत 10 फेब्रुवारी रोजी केवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून जबाबदारी झटकली.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
शिक्षक म्हणतो माझा मोबाईल हॅक झाला होता हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शिक्षक अविनाश भटू पाटील याने त्याचा मोबाईल हॅक झाल्याबाबत सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. त्या तक्रारीचाही अद्याप कोणताही तपास झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की,आम्ही व्हाॅट्सॲप कंपनीकडून माहिती मागविली आहे. माहिती मिळाल्यानंतर सत्यता समोर येणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि तांत्रिक तपास करुन संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी निवेदनात केली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा