Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ मार्च, २०२४
Home
/
Unlabelled
/
धुळयात बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न, धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी - सुभाष लोहार
धुळयात बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न, धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी - सुभाष लोहार
शिरपूर प्रतिनिधी :- धुळे शहरातील संत गाडगेबाबा सभागृह एकवीरा देवी जवळ येथील सभागृहात नुकतीच उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न झाली. यावेळेस या बैठकीत बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, सरचिटणीस चंद्रकांत गवळी, कार्याध्यक्ष सतीश दरेकर, कोषाध्यक्ष साहेबराव कुमावत, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मुकुंदराव मेटकर, उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे, प्रवक्ता किसनराव जोर्वेकर यांचा प्रमुख उपस्थित संपन्न झाली यावेळी विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शक करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय श्री विश्वकर्मा वंशीय समाज सेना, संचालक श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था शिरपूर माजी अध्यक्ष लोहार समाज मंगल प्रतिष्ठान धुळे अशा विविध सामाजीक संस्थेवर कार्यरत श्री सुभाष माधवराव लोहार शिरपूर यांची धुळे बारा बलुतेदार महासंघ जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी सुभाष भाऊ लोहार यांना नियुक्ती बद्दल सन्मान करून शाल,श्रीफळ व नियुक्ती पत्र देण्यात आले
या प्रसंगी राज्य सचिव दामोदर बिडवे, सतीश कसबे, राज्य उपाध्यक्ष भगवान श्रीमंदिल, प्रतापराव गुरव, धनंजय शिंगाडे, राज्य सचिव किशोर सूर्यवंशी, राज्य सदस्य राजेंद्र बागुल, शंकरराव चुरागले, साहेबराव पोपळघट, पुरागले ईश्वर मोरे, डी. एन. कोळी, विश्वकर्मा संस्था अध्यक्ष नरेंद्र हिरे, ओबीसी नेते सोमनाथ साखरे, राज्य उपाध्यक्ष गुरव समाज महासंघ विश्वासराव भामरे, *महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, बाराबलुतेदार धुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश गुरव, कृष्णा शिंदे शिवसेना उपमहानगर प्रमुख शेखर वाघ लॉन्ड्रीधारक जिल्हाध्यक्ष गणेश सगरे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सचिव धुळे भोला सगरे, भाजपा ओबीसी मंडळ सरचिटणीस संजय गवळी, मामा पेट्रोलियमचे प्रवीण चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गवळी, प्रसिद्धी प्रमुख रमेश चौधरी, संत गाडगेबाबा सभागृह धुळे अध्यक्ष अमोल गायकवाड, गणेश सगरे, भिका निकम, राजूभाऊ गवळी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा