Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० एप्रिल, २०२४

भारतीय संविधानाला कोणी हातसुद्धा लावू शकणार नाही- डॉ.हिना गावित.



शिरपूर प्रतिनिधी :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान परम पवित्र आहे. संविधानाला कोणी हातसुद्धा लावू शकणार नाही, काँग्रेस पक्षाकडे भाजप सरकारविरोधात मुद्देच नसल्यामुळे त्यांच्याकडून अपप्रचार केला जात आहे. भाजपच्या काळात संविधान पूर्णतः सुरक्षित होते, आहे आणि राहील असे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ.हीना गावित यांनी स्पष्ट केले. 

डॉ.हीना गावित 19 व 20 एप्रिलला शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असून दुर्गम आदिवासी भागासह ग्रामीण भागांना भेटी देत आहेत. त्यांचे गावपाड्यामध्ये मतदारांनी उत्स्फूर्त स्वागत करून प्रतिसाद दिला.

प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार ऍड.गोवाल पाडवी यांचे वडील ऍड.के.सी.पाडवी 35 वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यांना त्यांच्या गावाकडे जाणारा रस्ताही करता आला नाही, तो रस्ता मी करून दिला. त्यांच्या मतदारसंघात अनेक गावे विजेअभावी अंधारात होती. तिथे माझ्या कार्यकाळात वीज पोहचवली. अशा निष्क्रिय लोक प्रतिनिधिकडून भाजप आणि गावित कुटुंबावर होणारे हास्यास्पद आहेत असे हीना गावित यांनी सांगितले. 

शिरपूर तालुक्यात 22 हजार पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून घरकुलांचा लाभ मिळवून  दिल्याची माहिती डॉ.हीना गावित यांनी दिली. 

त्यांच्यासोबत प्रचार दौऱ्यात आमदार कांशीराम पावरा, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख के.डी. पाटील, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, सरलाबाई पावरा, आरती पावरा, सुशिलाबाई पावरा, अनिता पावरा, रतन पावरा, नारायण पावरा आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध