Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० एप्रिल, २०२४
आदिवासींच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र, आमदार काशीराम पावरा
शिरपूर प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यात सहा आदिवासीबहुल विधानसभा मतदारसंघ आहेत. विकासापासून दूर राहिलेल्या आदिवासी बंधू-भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात नेऊन त्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याचे काम भारतीय जनता पक्ष विविध योजनांच्या माध्यमातून करीत आहे. या कामासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीश भाई पटेल, मी स्वतः आणि भाजपचे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करीत आहोत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून आदिवासींच्या विकासासाठी झटत असलेल्या डॉ.हिना गावित यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी केले.
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आ.काशिराम पावरा,लोकसभा प्रमुख तुषार रंधे,सभापती माजी सभापती सत्तारसिंग पावरा, आदीवासी आघाडी चे प्रमुख जयवंत पाडवी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर माळी युवा नेते राहुल रंधे, मार्केट सभापती के डी पाटील, सभापती सरलाबाई पावरा, कोडीद चे सरपंच आरतीताई पावरा , प.स.सदस्य सुशीला बाई पावरा,
जिल्हा परिषद सदस्य अनिता पावरा रतन पाशरा,सामाजिक कार्यकर्ते नारायण पावरा योगेश बादल,जगण टेलर, कांतीलाल पावरा,सुकलाल महाराज, रमन पावरा,भास्कर बोरसे, बोराडी चे सरपंच सुखदेव मालचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील उपस्थित होते.
आमदार काशीराम पावरा म्हणाले की, आदिवासींना साक्षर करणे, उच्चशिक्षित करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा करून आत्मविश्वास मिळवून देणे यासाठी अमरीशभाई पटेल 1985 पासून काम करीत आहेत. त्यांच्या कार्यामुळे आदिवासींच्या दोन पिढ्या उच्चशिक्षित होऊन विविध पदांवर कार्यरत झालेल्या दिसतात. हे फार मोठे यश आहे आपल्या राजकारणाच्या माध्यमातून सामान्य माणसाला फायदा होईल, आदिवासींना त्यांच्या हक्काच्या योजना मिळतील याकडे अमरीशभाईंनी लक्ष दिले आहे,तेच काम नंदुरबार जिल्ह्यात डॉ.विजयकुमार गावित आणि हिना गावित करीत आहेत. त्यामुळे आदिवासींचा उद्धार या एकाच धाग्याने आम्ही सर्वजण एकमेकांची बांधले गेलो आहोत आणि भारतीय जनता पक्ष हाच आमचा एक परिवार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
शिरपूर तालुक्यात आदिवासींना मिळवून दिलेल्या सोयी सवलतींबाबत बोलताना ते म्हणाले की, दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले वन जमिनीचे हक्क दावे व त्या संबंधातील प्रश्न आम्ही सोडवू शकलो याचे समाधान आहे. साडेबारा हजार लाभार्थ्यांना वन हक्क जमीन प्रमाणपत्र मिळवून दिले. केवळ तेवढ्यावरच न थांबता त्यांचा सातबारा तयार करून घेतला. त्यामुळे आता अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना कर्जासह शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ मिळणे शक्य झाले आहे. अजूनही आदिवासींच्या विकासासाठी खूप काही करावयाचे आहे. त्यासाठी राज्यात आणि केंद्रात डबल इंजिनचे सरकार गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू मयांची नियुक्ती करून आदिवासी समाजाला भारताचे सर्वोच्च पद बहाल केले. यावरून त्यांची आदिवासींविषयीची कळकळ दिसून येते.
के.सी.पाडवी यांचा कारनामा : प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार ऍड.गोवाल पाडवी यांचे वडील आमदार के.सी.पाडवी यांना अमरिशभाई पटेल यांनी खूप मदत केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली.पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पाडवी यांना आदिवासी मंत्रीपद मिळाले आणि ते अहंकारी झाले.नंतर ते आमचेही फोन उचलत नव्हते. अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात ते एकदाही शिरपूरकडे आले नाहीत. त्यांचा मुलगा मुंबईला राहतो. आदिवासी भागातील समस्यांची त्यांना काहीच माहिती नाही. मग अशा लोकांना निवडून देऊन उपयोग काय ? त्याउलट आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, डॉ.हीना गावित नियमित शिरपूरला येतात, कार्यक्रम घेतात, योजनांचा पुरेपूर लाभ देतात.अशीच नेतेमंडळी लोकांचा खरा विकास करू शकतात. त्यामुळे भाजप उमेदवार डॉ.हीना गावित यांना मत म्हणजे विकासाला मत हे सर्वांनी लक्षात घ्यावे असे आवाहन आ.कांशीराम पावरा यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा