Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ जून, २०२४

कापूस पिकांमधील आंतरम शागतीचे महत्त्व विषयी माहिती देताना कृषी विभाग साक्रीचे अधिकारी जे बी पगारे



कापूस पिकांमध्ये सध्या आंतर मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. ही कामे वेळेवर केली तर पीक वाढीसाठी मोठा फायदा होतो. यंत्र मशागत कशी करावी याविषयी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री जे. बी. पगारे, श्री. आर आर बारसे कृषी सहाय्यक व श्री जी एल पवार कृषी पर्यवेक्षक यांनी मोजे आष्टाने येथे श्री सुभाष नारायण भदाणे यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन आंतरमशागत विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शेतकरी श्री खंडू कृष्णा भदाणे विनोद मधुकर भदाणे भुऱ्या भवरे हे उपस्थित होते.
कापूस पिकात आंतरमशागतीचे प्रमुख फायदे ः
- तण नियंत्रण
-जमिनीची पाणी धारण क्षमता वाढविणे.
-जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवणे.
-जमिनीला पडलेल्या भेगा बुजविणे.
-जमिनीचा पृष्ठभाग कडक झाल्यास तो मोकळा करणे.
-जमिनीतील हवेचे प्रमाण संतुलित ठेवणे.
-जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या व त्याची कार्यक्षमता वाढवणे.
-प्रति हेक्टरी झाडांची अपेक्षित संख्या ठेवणे इत्यादी.
कापूस-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी
कापसाच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक-तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनशील असतो. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास कापूस उत्पादनात लक्षणीय घट येते. या कालावधीनंतर पिकातील तण काढूनही उत्पादनातील होणारी घट भरून निघत नाही. म्हणून पिकांच्या संवेदनक्षम कालावधीनुसार योग्य वेळेमध्ये योग्य पद्धतीने तण नियंत्रण करणे आवश्यक असते. कापूस पिकात हा स्पर्धेचा कालावधी २० - ७० दिवसांपर्यंत असतो. या कालावधीत पीक तणमुक्त ठेवल्यास तणासोबत होणारी स्पर्धा टाळता येते.
आंतर मशागत व तण व्यवस्थापन
कपाशीचे पीक पहिले ९-१० आठवडे तण विरहित ठेवणे जास्त आवश्यक असते.त्याकरिता बियाणे उगवणीनंतर १० ते २० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा डवरणी करावी.आवश्यकतेनुसार २-३ वेळा निंदणी करावी.खुरपणी व निंदणी ही शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असले तरी गेल्या काही वर्षामध्ये मजुरांची उपलब्धता कमी होत गेल्यामुळे निंदणी त्रासदायक,वेळखाऊ व खर्चिक ठरू लागली आहे. म्हणून आपल्या जमिनीचा प्रकार, मजुरांची उपलब्धता व मजुरीचे दर अशा बाबींचा विचार करून खुरपणीच्या कामाचे योग्य नियोजन करावे.उदा.लाल मातीच्या जमिनी लवकर कडक होतात.म्हणून त्यात काळ्या जमिनीच्या तुलनेत अधिक मजूर लागतात. विविध पिकांचा कालावधी, पीक व तण स्पर्धेचा कालावधी व पिकांचा प्रकार यानुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री योगेश सोनवणे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले.

तरुण गर्जना न्यूज चैनल सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध