Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०२४
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर नूतून कार्यकारणी जाहीर
शेगाव प्रतिनिधी ( उमेश राजगुरे)
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना रजिस्टर नंबर एफ 5595 या संघटनेची शेगाव तालुका व शहर कार्यकारिणी दिनांक 25 /7/ 2024 रोजी विश्रामगृह शेगाव येथे एका बैठकीत गठीत करण्यात आली सदर बैठक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष देवचंद्र समदुर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी बैठकीला उमेश भाऊ शिरसाट श्रीकांत भाऊ कलोरे सागर शिरसाट उमेश राजगुरे अर्जुन कराळे संजय ठाकूर गौतम इंगळे ऋषिकेश देठे आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
यावेळी शेगाव तालुका अध्यक्षपदी सागर बाळकृष्ण शिरसाट तर शेगाव शहर अध्यक्षपदी श्रीकांत गोविंद कलोरे यांची निवड करण्यात आली तसेच शेगाव तालुका सचिव पदी गौतम इंगळे तर शेगाव शहर सचिव पदी उमेश राजगुरे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शेगाव तालुका उपाध्यक्षपदी अर्जुन कराळे तर शहर उपाध्यक्षपदी संजय ठाकूर तालुका कोषाध्यक्षपदी ऋषिकेश देठे तर शहर कोषाध्यक्षपदी दिनेश घाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सदस्य पदी कमलेश शर्मा, अक्षय सावदेकर, मिलिंद सराटे, दादा बाराहाते आदिंची निवड करण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा