Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास दोन हजारांची लाच घेताना एसीबीने केले अटक
धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास दोन हजारांची लाच घेताना एसीबीने केले अटक
धुळे प्रतिनिधी - धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबी ने अटक केल्याने काल जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती.
लोकसेवक सुनिल वसंत गावित, वरिष्ठ लिपीक, लेखा शास्त्रा, पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे यांनी तक्रारदार सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक यांचेकडुन २,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले होते.
तकारदार हे धुळे पोलीस दलातुन सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावरुन सन २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी सेवानिवृत्ती नंतर त्यांची राहिलेली बिले मंजुर होवुन मिळणे करीता दि.10/7/2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक, धुळे कार्यालयात अर्ज केले होते. त्यापैकी त्यांना १,२९,८८८/- रुपयांचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे उर्वरीत बिलांबाबत लेखा शाखेचे वरिष्ठ लिपीक सुनिल वसंत गावित यांची कार्यालयात भेट घेवुन चौकशी केली असता वरिष्ठ लिपीक सुनिल गावित यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलांच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले काढून देण्याचे काम करुन देण्याकरीता कोषागार कार्यालयातील कर्मचा-याच्या नावाने २,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ला. प्र. विभाग, धुळे कार्यालयात दी.2/8/2024 रोजी समक्ष येवुन दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. ०२.०८.२०२४ रोजी पंचासमक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे जावुन पडताळणी केली असता लेखा शाखेचे वरिष्ठ लिपीक सुनिल गावित यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष कोषागार कार्यालयातील कर्मचा-याच्या नावाने २,०००/-रु. लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचेविरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक श्री.माधव रेडडी व वाचक पोलीस निरीक्षक श्री.स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा