Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिरपुर तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस साजरा करा - माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे निवेदन
शिरपुर तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस साजरा करा - माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे निवेदन
शिरपूर प्रतिनिधी - माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबई यांच्या अंतर्गत कार्यरत शिरपूर तालुका कार्यकारिणीने तहसीलदार शिरपूर यांना निवेदन सादर करून 28 सप्टेंबर रोजी येणाऱ्या माहिती अधिकार दिवसाला तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा व याबाबत कार्यालयांना अवगत करण्यात यावे असे निवेदन शिरपूर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्यामार्फत देण्यात आले.
माहिती अधिकार का नागरिकाना हक्क प्रदान करणारा महत्वपूर्ण कायदा असून या कायामा प्रसार प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.
आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक केमा २००८/पत्रक.३७८/०८/ महा सामान्य प्रशाधन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक: २० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे. सदर शासन निर्णयाची एक प्रत या पत्रासोवत जोडलेली आहे.
सदर निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, व्याख्यानमाला इत्यादी विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. या शासन निर्णयाची या वर्षी आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी. अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.
या वर्षी २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी चौथा शनिवारची सुट्टी व २९ सप्टेंबर ला रविवार असल्यामुळे शासकीय निर्णयाप्रमाणे सदर माहिती अधिकार दिन हा २७ सष्टेंबर २०२४ किंवा ३० सप्टेंबर २०२४ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात अशी विनंती माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.
सदर निवेदन सादर करताना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष पूनमचंद मोरे, उपजिल्हाध्यक्ष माधवराव दोरी, जिल्हा कार्याध्यक्ष, कृष्णा शेटे, जिल्हा संघटक महेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मुलचंद शिरसाट आणि तालुका अध्यक्ष आशुतोष वाडीले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा