Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ सप्टेंबर, २०२४
बैलांना सजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडले
जलगांव जिल्हा ब्यूरो चीफ हमीद तडवी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच एरंडोल-नेरी रस्त्यावर जळके येथून पवन गोपाल सूर्यवंशी वय १७ वर्षे व अलताफ बंन्डु तडवी वय १९ वर्षे हे मोटर सायकल क्रमांक MH 19BV7531ने वावडदा येथे पोळा सण असल्यामुळे बैलासाठी साज घेण्यासाठी गेला होता परतीचा प्रवास करत असताना लहु पाटील यांच्या शेताजवळ सकाळी ९:३०वाजता नेरीकडुन समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक HR 73-9316 याने उडवलं यात मोटारसायकलवर मागे बसलेला पवन गोपाल सूर्यवंशी या तरुणांच्या अंगावरुन ट्रक चे चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अर्शिद सत्तार खान ( चालक) वय वर्षे ५० हा व त्याचा किन्नर शब्बीर हजरत खान वय २०वर्षे घटनास्थळावरून घेऊन एरंडोलच्या दिशेने पसार झाला.या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला मिळाल्याने त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला व येथील कर्तव्यावर हजर असणारे पोलिस कर्मचारी कपिल पाटील, दत्ता ठाकरे व दिपक पाटील यांनी एरंडोल चौफुलीवर अपघात ग्रस्त ट्रक सह चालक व किन्नर यांना ताब्यात घेतले.
यावेळी पोलीस कर्मचारी दिपक पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते. एरंडोल या ठिकाणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले,
पो.हे.कॉ.स्वप्नील पाटील याचे पथक पोहोचले व ट्रकसह आरोपींना ताब्यात घेऊन जळगाव येथे रवाना झाले.तसेच घटनास्थळी म्हसावद पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. प्रदीप पाटील यांनी मयत तरुणाचा मृतदेह शवच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला व अपघातग्रस्त मोटारसायकल ताब्यात घेऊन म्हसावद पोलिस ठाण्यात नेण्यात आली.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा