Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली. सर्व समावेशक विकासासाठी झटणारे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले.l
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली. सर्व समावेशक विकासासाठी झटणारे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले.l
मुंबई, दि. २७: - राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव स्मरणात राहतील,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते,माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
खानदेशच्या विकासाची तळमळ असणारा सुपुत्र महाराष्ट्राने गमावला आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
'ज्येष्ठ नेते पाटील यांनी दाजीसाहेब म्हणून आदराचे स्थान मिळवले होते.वडीलांकडून राजकारण समाजकारणाचा वारसा मिळालेल्या, उच्चशिक्षित अशा ज्येष्ठ नेते पाटील यांची वाटचाल सरपंच ते राज्याचे मंत्री अशी चढत्या आलेखाची राहीली आहे.विधानसभेचे ते दीर्घकाळ सदस्य राहीले होते. या काळात त्यांनी महत्वाच्या अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली.कृषी, सहकार,सिंचन, ग्रामविकास,संसदीय कार्य अशा क्षेत्रांतील अभ्यास,अनुभवाचा उपयोग त्यांनी राज्याच्या विकासासाठी केला.ज्येष्ठे नेते पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ, मार्गदर्शक असे नेतृत्व गमावले आहे.त्यांच्या निधनामुळे झालेला आघात सहन करण्याची ताकद पाटील परिवाराला मिळावी,ही ईश्वरचरणी प्रार्थना.ज्येष्ठ नेते,माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असे ही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा