Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

तिफण राज्य काव्य पुरस्कार जाहीर. सुनील डोके, अशोक गायकवाड, लक्ष्मण वाल्डे यांचा होणार सन्मान.



कन्नड ( प्रतिनिधी ) त्रैमासिक तिफण तर्फे नव्या पिढीतील कविंना लेखनासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या लेखनाचा यथोचित सन्मान व्हावा तसेच त्यांच्या हातून उत्तमोत्तम ग्रंथ निर्मिती व्हावी या महत्वपूर्ण उद्देशाने तिफण राज्य काव्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी सुनील डोके - पोशिंदा, अशोक गायकवाड - जीव रानात गहाण आणि लक्ष्मण वाल्डे - बहुरंगी या कविंची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक व तिफणचे संपादक डॉ. शिवाजी हुसे यांनी दिली. पुरस्कार निवड समितीचे , डॉ. शिवाजी हुसे ,डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. सुधाकर जाधव , डॉ. रामचंद्र झाडे यांनी ही निवड केली आहे. 

सुनील डोके हे जालना जिल्ह्यातील असून उपक्रमशील शिक्षक , कवी असून ग्रामीण व शेतकरी जिवनाचे चित्रण आपल्या कवितेतून प्रभावीपणे करतात.अशोक गायकवाड हे पारोळा ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी आहे ते आदर्श शिक्षक, कवी असून शेतकऱ्यांच्या व्यथा , वेदना कवितेतून मांडतात.लक्ष्मण वाल्डे हे पिशोर ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असून नवोदित कवी आहेत.महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. नव्या पिढीतील सातत्याने लेखन करणारे हे कवी आहेत जानेवारीत संपन्न होणाऱ्या तिफण राज्यस्तरीय कविता महोत्सवात हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.अशी माहिती तिफण कविता महोत्सवाचे संयोजक तथा तिफणचे संपादक डॉ.शिवाजी हुसे यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध