Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

काही दिवसांपूर्वी साक्री युनियन बँकेत एका इसमाचे पाच लाख रूपये चोरी केलेल्या आरोपीतांचा शोध घेऊन जेरबंद करण्यात साक्री पोलीसांना अखेर यश



साक्री दि.०३/०९/२०२४ रोजी दुपारी ०१.४० वाजता इसम नामे बाबुलाल नारायण गहीवडे वय ८० वर्ष रा.कावठे ता.साक्री जि. धुळे हे साक्री शहरातील युनियन बँकेत ५०००००/- रुपये भरणा करण्यासाठी गेले असता तेथे कोणीतरी अज्ञात इसमांनी बाबुलाल नारायण गहीवडे यांच्या हातातील पैशांची कापडी बॅग अज्ञात इसमांनी खालुन कापुन त्या कापडी पिशवी मधील ५०००००/ रुपये चोरुन पसार झाले होते.त्याबाबत साक्री पोलीस स्टेशनला गुरन ३१९/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ) प्रमाणे चा गुन्हा दि.०३/ ०९/२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता व पुढील तपास पोसई विनोद पवार साक्री पोलीस स्टेशन यांच्याकडे सोपविण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास चालु असतांना दि.०४/१०/२०२४ रोजी दुपारी १४.०० वाजेच्या सुमारास साक्री येथील स्टेट बँक ऑफ इंडीया येथुन बँक मॅनेजर यांनी फोनव्दारे पोलीस स्टेशनला कळविले की स्टेट बँकेत दोन
संशयीत इसम फिरतांना व रेकी
करतांना दिसत आहेत असे
कळविल्याने साक्री पोलीस स्टेशन चे 
सपोनि श्री अनिल बागुल यांनी पोलीस स्टेशनचे पोसई विनोद पवार,पोसई संदिप ससार,पोहेका/उमेश चव्हाण,पोकों/तुषार जाधव,पोकों रोशन चित्ते अशांना योग्य ते मार्गदर्शन व सुचना देवुन स्टेट बँकेत रवाना केले त्यांनी स्टेट बँकेत जावून नमुद संशयीत इसमांच्या हालचालींवर निगराणी ठेवुन खात्री केली असता सदर इसम काहीतरी गुन्हा करण्याच्या उददेशाने बँकेत फिरत असल्याचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन हजर केले असता त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांचेवर आणखी संशय बळावल्याने व त्यांना पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी साक्री येथील युनियन बँकेतील गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांनी त्यांचे नावे १)कबीर
बनवारीलाल सिसोदिया वय-२२ वर्ष २)अर्जुन मुकेश सिसोदिया वय-२० वर्ष दोन्ही रा.कडीया ता.पचोर जि.राजगड मध्यप्रदेश राज्य असे सांगीतले तसेच त्यांचे इतर दोन साथीदार असल्याची देखील कबुली दिली असुन त्यांच्याकडुन १००००/- रुपये रोख व त्यांनी गुन्हयात वापरलेली होंन्डा कंपनीची एसपी शाईन गाडी असा एकुण ७०,०००/- सत्तर हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त
करण्यात आली आहे.
तसेच दि.०३/०९/२०२४ रोजी पिंपळनेर ता साक्री जि धुळे येथील गु.र.नं.२३९/२०२४ या गुन्हयाची देखील नमुद आरोपीतांनी अशा स्वरुपाचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.नमुद आरोपीतांना साक्री पोलीस 
स्टेशन चोरीच्या गुन्हयात अटक करुन अधिक विचारपुस करून पुढील तपास करीत आहोत व उर्वरीत आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
नमुद गुन्हयातील आरोपीतांना अटक करण्याची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.श्रीकांत धिवरे धुळे,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे,धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबळे,सहायक पोलीस निरीक्षक श्री.अनिल बागुल,पोसई विनोद पवार पोसई.संदीप संसारे पोहेकों/उमेश चव्हाण पोहेका/संजय शिरसाठ,पोहेकों/शांतीलाल पाटील, पोकों/तुषार जाधव, पोकों/रोहन वाघ पोकों/निखिल 
काकडे स्टाफ अशांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध