Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा बेमुदत काम बंद आंदोलन तसेच साक्री तहसील कार्यालयावर मोर्चा



काल शनिवारी रोजी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून ते तहसील कार्यालय साक्री पर्यंत उमेद महिला बचत गट व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा भव्य असा मोर्चा तहसील कार्यालय येथे काढण्यात आला.मा.मुख्यमंत्री महोदय यांनी मा.मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीत लवकरच सर्व मागण्या पूर्ण करत आहोत असे आश्वासित केले होते दिनांक दहा ते बारा जुलै रोजी च्या आझाद मैदान नातील आंदोलन दरम्यान प्राप्त झालेल्या पत्रात मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अभियानातील सर्व महिला आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन पावसात भिजलेल्या 79 877 महिला केडर, कंत्राटी अधिकारी कर्मचारी व या सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे उमेद अभियानातील आम्हा सर्वांना कोणाचाच आधार दिसत नसून तीर्थ आपला मान राखून आंदोलन तूर्त थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता माननीय महोदय सध्या अभियानात सहभागी झालेल्या 78 लक्ष कुटुंबासोबत प्रत्यक्ष बोलून आंदोलनाबाबतची पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. मात्र सदर मागण्या अद्यापि शासन स्तरावर प्रलंबित असल्यामुळे आपणास आमचे जनसामान्याचे लोकप्रतिनिधी,कुटुंबप्रमुख, आमचा एकमेव आधार म्हणून या निवेदनाद्वारे नम्रपणे विनंती करण्यात येते की आमच्या संघटनेच्या खालील प्रमुख न्याय मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी आपणास न्याय मिळवून द्यावा. 
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना (आशा सेविका/अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे) शासकीय दर्जा देणे. 
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून स्थापनेला मान्यता दिल्यास ग्रामीण भागातील 84 लक्ष कुटुंबामध्ये आपल्या बाबत आदर निर्माण होऊन सदरच्या निर्णयातून शासनावर विश्वास ठेवून निर्माण होण्यास मदत होईल वरील मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राज्यासह आम्ही दिनांक ३/१०/२२४ पासून अधिकारी /कर्मचारी सर्व कॅडर सह कुटुंब बेमुदत संपावर जात आहोत तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अधिकारी कर्मचारी यांनी इत्यादी मागणीसाठी संपावर गेले असून साक्री तहसील कार्यालय येथे महिला बचत गट व अधिकारी कर्मचारी यांनी मोर्चा काढण्यात आला शासनाने याविषयी गांभीर्याने लक्ष देऊन उमेद अभियानाला न्याय मिळवून द्यावा व आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध