Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
मोटरसायकलला कट लागल्यावरून वाद अमलेश्वरनगरमधील तरुणाचा खून...! अवघ्या सहा तासात एलसीबी ने जामनेरहून आरोपी घेतले ताब्यात..
मोटरसायकलला कट लागल्यावरून वाद अमलेश्वरनगरमधील तरुणाचा खून...! अवघ्या सहा तासात एलसीबी ने जामनेरहून आरोपी घेतले ताब्यात..
अमळनेर प्रतिनिधी :- कट मारल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास जळोद अमळगाव शिवारात घडली.विकास प्रवीण पाटील वय ३० रा अमलेश्वर नगर हा आपल्या मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. मोटरसायकलला कट मारल्यावरून इंडिकेटर तुटले. त्यावरून दोन्ही गटात अमळगाव जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. या हाणामारीत विकास याचा मृत्यू झाला. ही घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच सहाययक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , संजय पाटील यांनी भेट दिली. विकास याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. आरोपी फरार झाले असून मारवड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. एलसीबी पथकाने अवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून संशयित आरोपी नितीन पवार , अमोल कोळी , हर्षल गुरव याना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा