Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी जुनी पेन्शन योजनेची बनावट कागदपत्रे तयार केल्याची गावात चर्चा?
चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी जुनी पेन्शन योजनेची बनावट कागदपत्रे तयार केल्याची गावात चर्चा?
[मुख्याध्यापकाचे कारनामे उघडकीस येणार ]
निपाणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालय निपाणे तालुका एरंडोल या शाळेचे मुख्याध्यापक श्री संदिप प्रभाकर महाजन यांना कुठल्या शासन निर्णयानुसार तसेच कोर्टाच्या आदेशानुसार प्रायव्हेट फंडासाठी देण्यात येणारा पीएफ क्रमांक २०५४८ कोणत्या नेमणूक कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेला आहे याची सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कारण संबंधित मुख्याध्यापक यापूर्वी ते एरंडोल येथील महात्मा फुले शाळेत नोकरीला असल्याचा दावा करतात.परंतु त्या शाळेची कुठल्याही प्रकारची कागदपत्रे या महाशयांकडे काही दिवसा पर्यंत उपलब्ध नव्हती.असे असतांना शिक्षण विभागाच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारामुळे या बाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. यात शिक्षण विभागाच्या काही भ्रष्ट लोकांना काही चिरी मिरी मिळाली आहे काय असे निदर्शनास दिसून येते. तसेच या मुख्याध्यापकावर लाचेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण जुन्या पेन्शन योजनेचा गैरमार्गाने लाभ घेतला असल्यामुळे आपण यात कधीही अडकू शकतो या भीतीने पैशांची खैरात वाटप करून बोगस कागदपत्रांची जुळवा जुळव करून शिक्षण विभागातील लेखा अधिकारी यांच्याकडे खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रस्ताव तयार करून मंजूर करून आणण्याचा प्रयत्न सदरचे मुख्याध्यापक करत असल्याचे समजते.परंतु या मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर करून मंजूर करून आणले असतील पण ते कधी आणि केव्हा हे देखील त्या मुख्याध्यापकांना सिद्ध करावं लागेल. कारण हे प्रकरण फक्त जिल्हा शिक्षणाधिकारी पुरतेच मर्यादित नसून शिक्षण उपसंचालक नाशिक, शिक्षण संचालक पुणे, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
वेळ पडली तर खंडपीठामध्ये या प्रकरणी दाद मागण्यात येणार आहे.अशी माहिती गावातील एक सुशिक्षित बेरोजगार तरुण ज्याची या संस्थेने व मुख्याध्यापक ने नोकरीचे खोटे आश्वासन देवून फसवणूक केलेली आहे.तसे त्याने काही पत्रकाराशी बोलताना तसा खुलासा केलाय.
आणि काही युवकांना शाळेत नोकरीच्या आशेने जवळ करून पत्रकार दिव्यांग व्यक्तीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी देऊन प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न देखील या मुख्याध्यापक ने केला आहे.
यात त्या युवकांचा दोष नाही त्यांना फक्त बळीचा बकरा बनवला गेला त्यांना वेळोवेळी गरज पडली तशी खोटे नोकरीचे आश्वासन देऊन प्रलोभन देत त्यांच्यासोबत जवळीक साधून दुसरीकडे त्यांची कामे कशी होऊ नये यासाठी कशा कशा टिप्स देण्यात आल्या याचा संपूर्ण लेखाजोखा वेळ आल्यावर संस्था अध्यक्ष व संपूर्ण संचालक मंडळ व जे युवक नोकरीच्या आशेने आजही या मुख्याध्यापकाच्या अवतीभवती फिरत आहे त्यांच्यासमोर नक्की मांडला जाणार आहे. त्यामुळे त्या दिवशी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्या दिवशी सर्वांनांच कळेल की मुख्याध्यापक आपल्याविषयी किती चांगलं मनाने काम करत होते.त्यासाठी योग्य दिवस वेळ येऊ द्या नक्की खुलासा होईल सत्य परेशान है पराजित नही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा