Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
पारोळा पोलीस स्टेशनची धडक कारवाई
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील
आंबापिंपरी शिवारातील एका शेतकऱ्याच्य शेतात अवैधरित्या गांजाची शेती केल्याने त्या ठिकाणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व पारोळा पोलिसांनी कारवाई करून सुमारे १२० किलो ११९ ग्राम म्हणजेच १२ लाख १ हजार १९० रुपये किमतीची गांजाची ओली ताजी झाडे जप्त केली आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, राहुल कोळी, भगवान पाटील, विलास गायकवाड, सुनील हाटकर, बापू पारधी, संदीप सातपुते, प्रकाश गवळी, महेश पाटील, किशोर भोई यांनी केली.
याबाबत दि.५ रोजी संशयित आरोपी अरुण दोधु कोळी (रा. आंबापिंप्री ता. पारोळा) याने आंबापिंप्री शिवारात त्याचे शेत गट ३०६ चें बांधावर अंदाजे १२,०१,१९० रु किंमतीचे एकुण १२० किलो ११९ ग्रॅम वजनाचे ओले हिरवे गांजाच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केली. म्हणुन अरुण दोधु कोळी याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (केसीएन) याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल राहूल कोळी यांनी फिर्याद दिली आहे. सदर अरुण कोळी हा फरार असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा