Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
परभणी जिल्हातील घटने बाबत तात्काळ कार्यवाही करा अन्यथा कापडणे परिसर अन्याय अत्यांचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देवभाने फाट्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा.....
परभणी जिल्हातील घटने बाबत तात्काळ कार्यवाही करा अन्यथा कापडणे परिसर अन्याय अत्यांचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देवभाने फाट्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा.....
धुळे प्रतिनिधी :- परभणी जिल्हात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांच्या वतीने नास ढूस करण्यात आली होती त्याला तिथेच परिसरात काही भीम सैनिकांनि चोप देत पोलिसांच्या स्वाधीन गेले त्यानंतर घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरासह जिल्ह्याबाहेर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरू लागल्याने शहरात भीमसैनिकांनी एकत्र भव्य मोर्चा काढत कडकडीत बंदची हाक दिली, याच मोर्चा दरम्यान काही आक्रमक भिमसैनिकांसह बाहेरील काही समाजकंटकांनं कडुनं जाळपोळ करत वाहणाची ही तोडफोड करण्यात आली, तसेंच सदर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पोचल्याने महाराष्ट्रातील भीमसैनिकांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.
म्हणून हा प्रकार घडू नये या संदर्भात धुळे जिल्ह्यातील कापडणे परिसरातील तरुणांनी एकत्रित कापडणे परिसर अन्याय अत्याचार निर्मूलन संघर्ष समिती स्थापन करीत त्या माध्यमातून सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.सचिन कापडणीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे, या निवेदनात म्हटले आहे की सदर घटनेतील अटक असलेल्या आरोपीची कसून चौकशी करत या घटने मागील मास्टर माईंड कोण..? याचा 48 तासाच्या आत शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा कापडणे परिसर अन्याय अत्याचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देवभाने फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल तसेच होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदन स्वीकारताना सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सचिन कापडणीस साहेब, तसेच निवेदन देताना साप्ताहिक सामान्य लोकनजर चे संपादक समाधान सुनील देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल भामरे, भूषण ब्राह्मणे, रमेश भामरे, विनोद भामरे, सिद्धार्थ बागुल, सिद्धार्थ शिंदे, कमलेश भामरे, विनोद मधुकर भामरे, मयूर संजय भामरे, आकाश भामरे सिद्धार्थ शिरसाठ, राकेश निकम, किरण देवरे, जितेंद्र चव्हाण, राहुल पांचाळ, उमेश शिलावट शाहरुख पिंजारी, भगवत धिवरे, सागर पारधी, अश ब्राह्मने, सह मोठ्या संख्येने बहुजन समाज व भीमसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा