Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
मालेगावात भल्या पहाटे थरार, कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं झालं तरी काय ?
मालेगावात भल्या पहाटे थरार, कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं झालं तरी काय ?
मालेगाव प्रतिनिधी:-कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे.भल्या पहाटेच हा प्रकार घडल्याने मालेगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली. देवदर्शनाहून येताना काही टवाळखोरांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. गो तस्करी थांबवण्यासाठी अविष्कार भुसे यांनी प्रयत्न केल्याचे समजते. त्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला आहे. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
गो-तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसेंच्या वाहनावर टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. संशयित गो-तस्कर असल्याचे समोर येत आहे. पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे दिसून आले. देव दर्शनाहून परतत असताना हा प्रकार घडला. आयशर गाडीत जनावर चोरून नेत असल्याचा संशय आल्याने अविष्कार भुसे यांनी वाहनातून पाठलाग केला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयशर वाहन पोलिसांकडून हस्तगत
या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला आहे. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारात अविष्कार भुसे यांनी केलेल्या धाडसामुळे गो-तस्करी थांबवण्यात यश आले असून काही गायींची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा